यावल येथे सिकलसेल नियंत्रणावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 07:29 PM2018-12-21T19:29:52+5:302018-12-21T19:31:23+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत यावल येथे सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली.
यावल, जि.जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथे सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन न्यायाधिश डी.जी.जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी न्यायाधिश जगताप यांनी सिकलसेल आजाराकडे गंभीर लक्ष देण्याची गरज असून, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजाराची लक्षणे व त्यावरील नियंत्रणासाठी जनजागृती करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
सिकलसेल आजार व त्यावरील नियंत्रणाच्या जनजागृतीसाठी येथील महाविद्यालयीन युवक-युवती व साने गुरूजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आजार व नियंत्रणविषयक घोषणा दिल्या. कार्यशाळेत तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी सिकलसेल आजार म्हणजे काय? आजाराचे निदान व उपचार पध्दतीबाबत सविस्तर माहिती दिली.
तालुका समन्वयक सुहास कुळकर्णी यांनी सफरर व वाहक रुग्णांंची व त्यासंबंधीच्या शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यकमास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोेज पाटील, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रशेखर साळुंके, साने गुरूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघ, क्षयरोगतज्ज्ञ नरेंद्र तायडे उपस्थित होते.