सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:29 PM2018-12-15T12:29:41+5:302018-12-15T12:29:53+5:30

-विकास पाटील सुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या ...

Heritage of Bhikmachand Jain, the father of Sureshdada Jain | सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

Next

-विकास पाटील
सुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या प्रेमापोटी ३० वर्षे ते नगराध्यक्ष होते. लहानपणापासून वडिलांचे कार्य मी अनुभवत होतो. मात्र माझी राजकारणात येण्याची सुरुवातीला इच्छा नव्हती. त्याऐवजी व्यवसाय करावा अशी इच्छा होती. खान्देश मील त्यावेळी सुरु होती. मात्र कुटुंबातील एका सदस्याने राजकारणात आले पाहिजे, असा विचारपुढे आला. मी राजकारणात यावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यानुसार पुढे राजकारणात आलो व त्यामाध्यमातून सेवेचे अखंड कार्य आजही सुरु आहे, सुरेशदादा जैन सांगत होते.
१९७७ मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक मी लढवावी, अशी इच्छा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांनी व्यक्त केली. मात्र त्यावेळी ईश्वरलाल जैन यांना उमेदवारी देण्याचे एकमताने आम्ही ठरविले व ते काँग्रेसतर्फे निवडून आले. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने ही जागा रिक्त झाली. १९८० मध्ये पुन्हा निवडणूक लागली.
१९८० पर्यंत मी पूर्णवेळ व्यवसायात होतो. १९८० ला विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व राजकारणात आलो. व्यवसायाची धुरा भाऊ रमेशदादा जैन यांच्याकडे सोपविली. १९८० ला आमदार म्हणून निवडून आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्येक पाच वर्षानंतर झालेल्या निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला, मतदारांचे प्रेम मिळत गेले व मी जनसेवा सुरु ठेवली. आज ४० वर्षे झाली. जनतेचे प्रेम कायम आहे. ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यात जनतेसह कुटुंबीयांचीही समर्थपणे साथ मिळाली. त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. जोपर्यंत आरोग्याची साथ मला मिळेल तोपर्यंत जनसेवेचा हा अखंड यज्ञ सुरुच राहिल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
पत्नी रत्ना, मुलगा राजेश, शैलेंद्र व मुलगी मिनाक्षी यांची आयुष्याच्या प्रत्येक
वडिल स्व.भिकमचंद जैन हे ३० वर्षे जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या इच्छेनुसार मी राजकारणात आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले मात्र जनतेच्या प्रेमापोटी ४० वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. वडिलांचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
टप्प्यावर साथ मिळाली व आजही ती मिळत आहे. राजेश, शैलेंद्र हे व्यवसाय सांभाळत असून मिनाक्षी या एसडी-सीडच्या माध्यमातून कार्य करीत असून मी आनंदी व समाधानी आहे.

माझ्या आयुष्यात ‘लोकमत’चा वाटा मोठा आहे. एक निर्भिड, निस्पृह वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ची ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, अडीअडचणी, व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असतो. ‘लोकमत’ची अशीच भरभराट होवो, या शुभेच्छा.
-सुरेशदादा जैन, माजी मंत्री.

Web Title: Heritage of Bhikmachand Jain, the father of Sureshdada Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव