जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीश पाटील यांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:00+5:302020-12-30T04:22:00+5:30

विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट सादरीकरण जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनिटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेसाठी सुचविलेल्या ...

Hershal Patil and Girish Patil won in the district level youth parliament | जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीश पाटील यांनी मारली बाजी

जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील, गिरीश पाटील यांनी मारली बाजी

Next

विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट सादरीकरण

जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनिटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान - समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकऱ्यांसाठी वरदान - शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण केले.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून ४२ तर बुलडाणा जिल्ह्यातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. पंकजकुमार नन्नवरे, डॉ. राधेश्याम चौधरी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ. दिनेश पाटील, विनोद ढगे, दीपक सपकाळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर होते. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी यांनी मानले, तर कार्यक्रमासाठी चेतन वाणी, आकाश धनगर, शाहरूख पिंजारी, रोहन अवचारे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून हर्षल प्रवीण पाटील व गिरीश घनश्याम पाटील आणि बुलडाणा जिल्ह्यातून अभिजित अनिल खोडके व सलोनी संजय त्रिवेदी यांची निवड करण्यात आली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय युवा संसदेमधून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा १ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद १२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे, असे नेहरू युवा केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Hershal Patil and Girish Patil won in the district level youth parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.