पतीच्या निधनानंतर मुलांना दिले उच्च शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:44 PM2018-10-17T22:44:41+5:302018-10-17T22:46:37+5:30
सातगाव डोंगरी, ता.पाचोरा येथील सखुबाई बाबूलाल तडवी यांनी पतीच्या निधनानंतरही मुलांना उच्चशिक्षण देत आदिवासी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सातगाव डोंगरी, ता.पाचोरा : येथील सखुबाई बाबूलाल तडवी यांनी पतीच्या निधनानंतरही मुलांना उच्चशिक्षण देत आदिवासी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सखुबाई या दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करीत आदिवासी आश्रम शाळा असल्याने त्यांनी मुलांना याठिकाणी दाखल केले. या दरम्यान त्यांच्या पतीचे निधन झाले. चार मुले व चार मुली असताना त्यांनी निराश न होता उत्तम शिक्षण दिले. मोठा मुलगा श्रावण हा नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन पाचोरा महाविद्यालयात प्राध्यापक झाला. दुसरा व तिसरा मुलगा एमए बीएड आहे. मुलगी एम.ए.मानस शास्त्रात सेट उत्तीर्ण आहे. तीन नंबरची मुलगी एम. ए. इंग्रजी करून पिंपळगाव हरेश्वर येथे नोकरीला तर चार नंबरची मुलगी जळगावला बी.ए.करीत आहे. सखुबाई यांनी मोलमजुरी करून मुलांना उच्चशिक्षित करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.