दोन वर्षामध्ये चार तालुक्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:04 PM2019-08-01T12:04:49+5:302019-08-01T12:05:37+5:30

मुलांचे सामूहिक विवाह करणार : पारोळा, अमळनेर, जामनेर व चाळीसगावचा समावेश

The highest number of farmer suicides in four talukas in two years | दोन वर्षामध्ये चार तालुक्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दोन वर्षामध्ये चार तालुक्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next


जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना घडत असून, गेल्या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्येच्या घटनांमध्ये ७० टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. तर यामध्ये सर्वाधिक आत्महत्येच्या घटना या पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या भागात झाल्या आहेत. अशी माहिती हॅप्पी मिरर रिसर्च अ‍ॅण्ड मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. आशिष जाधव यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, प्रा. डी. डी. बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अशपाक पिंजारी उपस्थित होते. माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्याग्रस्त शेतकºयांची माहिती व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील आत्महत्या झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली होती. यामध्ये २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्यांचे संख्या शास्त्रीय विश्लेषण केले असता, आत्महत्या केलेल्यांमध्ये ९५ टक्के पुुरुष हे शेतकरी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली. सन २०१२ ते २०१७ दरम्यान झालेल्या आत्महत्यांमध्ये १५ ते ३३ वयोगटातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याच्या कारणांमागे कर्जबाजारीपणा व दारुच्या व्यसन आहे. तसेच एस. सी., एस. टी व मुस्लीम समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याचेही ते म्हणाले.

शेतकºयांच्या मुला-मुलींसाठी मेट्रोमेनियम वेबसाईट सुुरु करणार
आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या मुला-मुलींसाठी यासाठी निशुल्क मेट्रोमेनियम वेबसाईट सुरु करण्यात येणार आहे. यातून निशुल्क सामुहिक विवाह सोहळा करण्यात येणार आहे. तसेच आत्महत्येच्या घटनांना आळा बसण्यासाठी पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या ठिकाणी शोध, बोध व उपाय या विषयाला धरुन एक दिवसीय कार्यशाळादेखील घेणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The highest number of farmer suicides in four talukas in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.