घरकूल प्रकरणाच्या ठळक घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 04:00 PM2019-08-31T16:00:16+5:302019-08-31T16:01:05+5:30

२७ जानेवारी २००६- तत्कालिन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस स्टेशनला ४५ पानांची इंग्रजीत फिर्याद दिली. त्यानुसार आजी, माजी ...

 Highlights of the Homeschool Case | घरकूल प्रकरणाच्या ठळक घडामोडी

घरकूल प्रकरणाच्या ठळक घडामोडी

Next

२७ जानेवारी २००६- तत्कालिन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस स्टेशनला ४५ पानांची इंग्रजीत फिर्याद दिली. त्यानुसार आजी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व ठरावाला मतदान करणाऱ्या ९० जणांविरुध्द कलम १२० ब, ४६८, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
२८ डिसेंबर २०११- रोजी घरकूल घोटाळ्याच्या तपासाला वेग आल्याने तत्कालिन नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, पुष्पा पाटील, चत्रभुज सोनवणे व लक्ष्मीकांत चौधरी यांची अटकपूर्व जामीनासाठी धाव.
२९ डिसेंबर २०११- तत्कालिन नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, पुष्पा पाटील, चत्रभुज सोनवणे व लक्ष्मीकांत चौधरी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.
२८ जानेवारी २०१२- उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डरचे मेजर वाणी, राजा मयूर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक.
१ फेब्रुवारी २०१२- माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, चत्रभुज सोनवणे यांची चौकशी.
२ फेब्रुवारी २०१२- तत्कालिन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांची तब्बल एक तास चौकशी.
१७ फेब्रुवारी २०१२- माजी नगरसेवक विजय वाणी यांनी तपासाधिकारी ईशू सिंधू व फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्याविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
२० फेब्रुवारी २०१२- प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजर वाणी, पी.डी.काळे यांचा जामीन फेटाळला.
१० मार्च २०१२- आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव पोलिसांनी धरणगाव येथे रात्री ११.५० वाजता ताब्यात घेऊन मध्यरात्री १.३० वाजता अटक केली.
११ मार्च २०१२- अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांनी आमदार सुरेशदादा जैन यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
२६ मार्च २०१२- प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजर वाणी यांचा जामीन औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळला तर मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना जामीन मंजूर.
१७ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४६ जणांना नोटीस व १९ मे रोजी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश.
१९ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा पोलिसांना चकवा. दुपारी तब्बेत खराब असल्याने आपण नंतर हजर होऊ असा पोलीस अधीक्षक कार्यालयात फॅक्स पाठविला.
२१ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये हजेरी. पोलिसांनी अटक करीत त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांच्यासह १९ संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
४ जुलै २०१२- औरंगाबाद खंडपीठाने पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.
१८ जुलै २०१२- औरंगाबाद खंडपीठात पालकमंत्री देवकर यांची दांडी. न्यायालयाने कामकाजासाठी २० जुलै ही तारीख दिली.
२० जुलै २०१२- हायकोर्टाने घरकूल प्रकरणात सादर केलेल्या आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे आदेश दिले.
२७ जुलै २०१२- पोलिसांनी पालकमंत्री देवकर यांच्या अटकेनंतर न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्ट उच्च न्यायालयात सादर केला.
३१ जुलै २०१२- न्यायालय सुटीवर असल्याने पालकमंत्री देवकर यांच्या विरोधातील याचिकेवरील निर्णय आठवडाभरानंतर.
२ सप्टेबर २०१६- सुरेशदादा जैन सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
४ सप्टेबर २०१६- सुरेशदादा जैन यांचे धुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरात आगमन

Web Title:  Highlights of the Homeschool Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.