जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:55 PM2018-08-09T18:55:07+5:302018-08-09T19:01:40+5:30
आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला.
जळगाव : आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. सरकारने आतापर्यंत आरक्षणाबाबत आश्वासनाची खैरात केली, आता मात्र संयम सुटत चालला आहे. होणाºया परिणामाला सरकार जबाबदार राहिल असाही इशारा यावेळी देण्यात आला.
क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली होती, त्यानुसार जळगावात गुरुवारी राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावरील बांभोरी नजीकच्या गिरणानदीवरील पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी दोन वाजता सुरु झालेला रास्ता रोको दुपारी ४.५० वाजता मागे घेण्यात आला. त्यामुळे जवळपास तीन तास महामार्ग बंद होता. मराठा आरक्षणाची शपथ घेऊन राष्टÑगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला
यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारविरुध्द घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘हमारी मांगे पुरी करो, वर्ना खुर्ची खाली करो’, ‘असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, यासह जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ आदी घोषणा देण्यात आल्या.