महामार्गाबाबत काथ्याकुट अन् अपघात सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 01:04 AM2017-02-17T01:04:59+5:302017-02-17T01:04:59+5:30

आहुजानगरनजीक घटना : मतदानासाठी जात असताना ट्रकने वाघनगरातील दाम्पत्यास उडविले

Highway and accidents in the beginning | महामार्गाबाबत काथ्याकुट अन् अपघात सुरुच

महामार्गाबाबत काथ्याकुट अन् अपघात सुरुच

Next

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चुंचाळे, ता. चोपडा येथे मतदान करण्यासाठी दुचाकीवर जात असताना शरद इधन कापुरे (30), अनिता शरद कापुरे (25, दोघे रा. वाघनगर, जळगाव) यांच्या दुचाकीला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दाम्पत्य जखमी झाले. यात अनिता कापुरे यांना गंभीर इजा झाली आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर आहुजानगरनजीक घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून बालंबाल बचावलेल्या या दाम्पत्यावर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी पुन्हा अपघात झाला. असुरक्षित महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे.  उपाययोजना होत नसल्याने अपघात सुरूच आहे. अशाच प्रकारे गुरुवारीदेखील महामार्गावरुन वाहन खाली उतरवूनही दुचाकीला धडक बसली.
रिक्षा चालकाने आणले रुग्णालयात
अपघातानंतर शरद कापुरे यांनीच एका रिक्षा चालकाच्या मदतीने अनिता कापुरे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे महिलेल्या डोक्याला टाके पडले असून दोघांवरही उपचार सुरू आहे.
बालंबाल बचावले
मागून येणा:या ट्रकचा वेग पाहून शरद कापुरे यांनी आपली दुचाकी (क्र.एम.एच.19 सी.एल.1798) रस्त्याच्या खाली उतरविली. अन्यथा रस्त्यावरच ही धडक बसली असती तर जीवावर बेतण्याची शक्यता होती. त्यामुळे बालंबाल बचावल्याचे शरद कापुरे यांनी सांगितले.
ट्रकचालक फरार
अपघातानंतर ट्रक चालक न थांबताच निघून घेला. त्यात दुचाकीस्वाराने क्रमांक पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात केवळ पी.बी. 4613 एवढाच क्रमांक दिसला. त्यातील सिरीज लक्षात आली नाही, एवढय़ा वेगात हा ट्रक चालक होता.


धोकादायक ठिकाण
महामार्गावरील आहुजानगरचे हे ठिकाण अत्यंत धोकादायक ठरत असून दोन महिन्यांपूर्वीच एका कंटनेरला कारची धडक बसून नाशिकच्या तिघांचा जळून कोळसा झाला होता.त्यानंतर कांदा घेऊन येणा:या ट्रॅक्टरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते.  महामार्गावरील अपघातांचे हे प्रमाण पाहता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Highway and accidents in the beginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.