महामार्गावरील कर्मचाऱ्याचा पाईपात अडकून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 06:04 PM2020-07-07T18:04:09+5:302020-07-07T18:04:47+5:30
दुर्घटना : वाघूर नदीत पाय सटकल्यावर काळाचा घाला
भुसावळ :-महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यासाठी नदीपात्रातून करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपात अडकून महामार्गावरील कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कायार्साठी वेल्डिंग सेक्शन मधील वेल्डर पदावर कार्य करणारा दिल्ली येथील मूळ रहिवासी लालबाबू पंडित (४५) हा कामासाठी नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा पाय निसटला व तो सरळ नदीपात्रात टाकलेल्या पाईपात जाऊन अडकला. शेवाळ असल्या कारणाने लालबाबू पाइपातून आरपार बाहेर येऊ शकला नाही व पाय सरळ छातीला लागून गोलाकार स्थितीमध्ये गुदमरून अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र मात्र साकेगाव मधील एखादी व्यक्ती याठिकाणी अडकली असती तर या विचाराने साकेगाव मध्ये संतप्त संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नदीपात्रातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची परवानगी नाही?
महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे कार्य सोपे व्हावे याकरिता वाघूर नदीपात्रातून रस्ता तयार केला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा याकरिता नदीमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यात ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्यात टाकण्यात आले आहे, याठिकाणी साकेगावकर नेहमी अंघोळीसाठी व महिला कपडे धुण्यासाठी तसेच मासेमारी व्यवसाय करणारे मासे पकडण्यासाठी येत असतात अशा परिस्थितीमध्ये कोणी पाईपात अडकले तर त्यास कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विनापरवानगी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये आकाराने मोठे पाईप जर टाकले असते तर सदर व्यक्ती पाईप मधून बाहेर आला असता व त्याचे प्राण वाचू शकले असते, मात्र पाईपाची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.
मुलीचे होणार होते लग्न..
मयत लालबाबू यांच्या मुलीचे लग्न ठरलं ठरले होते यातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान त्याचे कामावरचे सहकारी यांनी माणुसकीच्या नात्याने मुलीच्या लग्न कार्याची जबाबदारी उचलली असून सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे अधिकारी देवेंद्र महाडिक यांनी सांगितले.
याबाबत नशिराबाद नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.