आनंदी जीवनाचा राजमार्ग ‘योगा’: अंजली पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:30 PM2018-06-21T13:30:38+5:302018-06-21T13:30:38+5:30
आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय अधीक्षक अंजली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जळगाव : आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय अधीक्षक अंजली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वयाच्या ११ व्या वर्षापासून योग साधना करणाऱ्या अंजली पाटील यांच्याशी योगदिनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला असता त्यांनी सर्वप्रथम आवाहन केले की, अख्या जगानेही स्वीकारलेल्या या विद्येचा आपल्या देशातही अधिकाधिक प्रचार, प्रसार झाला पाहिजे. सर्वांनी निरामय आरोग्यासाठी योगाचा स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी योग दिनानिमित्त केले.
अंजली पाटील यांनी सांगितले की, मी लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळत असल्याने त्या सोबतच मला योगाचेही धडे दिले गेले. योगाचा प्रसार आज वाढत आहे, ही आनंदाची बाब असून मला शालेय जीवनापासूनच हे धडे मिळाले व सलग ३५ वर्षांपासून मी नियमित योगा करीत आहे. याचा फायदा होऊन मी रेल्वेच्या व्हॉलीबॉल संघाची प्रशिक्षक म्हणून सध्या काम करीत असून आमच्या प्रत्येक खेळाडूलादेखील आम्ही योगाचे धडे देत असते.
योगाद्वारे करण्यात येणाºया विविध आसनांमुळेच पाठदुखी, गुडघ्यांचा त्रास होत नाही. त्यामुळे व्हॉलीबॉलमध्ये यशाचे शिखर गाठता आले, असे अंजली पाटील यांनी सांगत सर्वांनी याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
व्हॉलीबॉलसाठी शरीराला लवचिकता, तणावमुक्ती आवश्यक असून ती योगाद्वारेच मिळते. सोबतच खेळत असताना कोणतीही इजा होऊ नये म्हणून योगाचा आम्ही पुरेपूर उपयोग करीत असतो. खेळताना उंच उडी घेताना इजा होण्याची व पाठीचा त्रास (बॅकपेन) होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठीच योगाद्वारे शरीर लवचित ठेवण्यास मदत होते व शरीरास इजा होत नाही असे अंजली पाटील यांनी स्पष्ट केले.