महामार्गाने घेतला आणखी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:34 AM2020-05-26T11:34:56+5:302020-05-26T11:35:09+5:30

बांभोरीजवळ अपघात : पाळधी जाताना घडली दुर्घटना

The highway took another victim | महामार्गाने घेतला आणखी बळी

महामार्गाने घेतला आणखी बळी

Next

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राजेंद्र किसन केवारे (४०, रा.पिंप्राळा) हे जळगाव आगाराचे बस कंडक्टर (वाहक) जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता महामार्गावरील बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र केवारे जळगाव एस.टी.आगारात कंडक्टर होते. थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येतो असे केवारे यांनी घरात सांगितले. दुचाकीने (क्र.एम.एच.१९-५२४३)पाळधीकडे जायला निघाले. बांभोरी गाव ओलांडल्यानंतर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अपघात झाला.

भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात केवारे दुचाकीवरून खाली फेकले गेले व त्यातच त्यांच्या पोटावरून ट्रकचे टायर गेले. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या मांसाचे तुकडे झाले व जागीच गतप्राण झाले.अपघात होताच बांभोरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी गजानन महाजन व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

धुळ्याहून झाली होती बदली
राजेंद्र केवारे हे मूळ धुळे येथील रहिवाशी होते. याआधी ते शनी पेठेत वास्तव्याला होते. आता ते पिंप्राळा येथे वास्तव्याला गेले होते. त्यांची काही दिवसापूर्वीच जळगाव आगारात बदली झाली होती. त्यांचे आई, वडील धुळे येथे वास्तव्याला आहेत. पत्नी योगिता, मुलगा कुणाल व सुमीत यांच्यासह ते जळगावात वास्तव्याला होते.

ट्रक अपघातातील दुसºया भावाचाही मृत्यू
गेल्या आठवड्यात विद्यापीठासमोर ट्रक अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद रमेश पाटील (३०, रा.पाळधी, ता.धरणगाव) या तरुणाचा रविवारी मध्यरात्री उपचार सुरु असताना मृत्यू झाला. १७ मे रोजी सकाळी ९ वाजता मजूर घेऊन जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. त्यात महेंद्र रमेश पाटील (३६) हा मोठा भाऊ जागेवरच ठार झाला होता तर प्रल्हाद गंभीर जखमी झाला होता. रविवारी रात्री प्रल्हादची प्राणज्योत मालवली. प्रल्हाद हा छायाचित्रकार होता. दोन दिवसात दोन छायाचित्रकारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी उमेश प्रजापत या छायाचित्रकाराचा कार अपघातात राजस्थानात मृत्यू झाला.

Web Title: The highway took another victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.