महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:11 PM2020-06-04T12:11:13+5:302020-06-04T12:11:30+5:30

बायपासची दुरवस्था : पावसाळ्यात पेलू शकतील का अरुंद अन् खड्डेमय रस्ते वाहतुकीचा भार?

Highway widening work is slow | महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने

महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने

Next

जळगाव : महामार्ग रुंदीकरणाचे काम पुन्हा एकदा संथगतीने सुरू असून बायपास रोडचीही देखभाल करण्याचे कष्ट न घेतल्याने या रोडची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. अरुंद अन् मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेले हे रस्ते अवजड वाहने अन् छोट्या मोठ्या वाहनांचा भार पेलणार का? असा प्रश्न आता पावसाळ्याच्या तोंडावर उपस्थित होत आहे. शहरातील दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, प्रभातचौक याठिकाणी महामार्गाला बायपास देण्यात आला असून या तिन्ही बायपासची अवस्था एकसारखीच आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील ८ किलोमीटरच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्यात येणार होते. सुरुवातीपासूनच हे काम या ना त्या कारणाने रेंगाळत राहिले आहे. काम अतिशय वेगाने करण्याचा निश्चय ठेकेदार असलेल्या कंपनीने व्यक्त केला; सुरुवातीला हे काम वेगात सुरूही झाले. मात्र त्यानंतर ते रेंगाळत राहिले.
गुजराल पेट्रोलपंपसमोर महामार्गावरून वीज वाहिनी गेली असल्याने याठिकाणी होणाऱ्या अंडरग्राऊंड मार्गाचे काम रेंगाळत राहिले. हे काम अजूनही रेंगाळलेलेच आहे. एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा कंपनीने विश्वास व्यक्त केला होता.
मात्र हे काम पूर्ण झालेच नाही, शिवाय दादावाडी तसेच प्रभातचौक याठिकाणीही कामाने म्हणावा तसा वेग घेतला नाही. प्रभातचौक, गुजराल पेट्रोलपंप आणि दादावाडी याठिकाणी मुख्य महामार्गाला बायपास देण्यात आले असून ते बायपासही अरुंद आहेत अन् ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरुपात हे बायपास केले होते, त्याची आता मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.
महामार्गावर सध्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून त्यामुळे या अरूंद आणि असंख्य मोठ्या खड्ड्यांनी बनलेल्या बायपासने लहान वाहनांना जाताना अडचणी निर्माण होत आहे.
दरम्यान, लॉकडाउन झाल्यामुळे महामार्गाचे कामच थांबवण्यात आले. हे काम लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही मजुरांना घेऊन संथगतीने सुरू करण्यात आले. रेल्वे पुलापुढील जवळपास अर्ध्या किलोमीटरच्या रुंदीकरणाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. त्यावरून आता वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. सध्याही किरकोळ प्रमाणात महामार्गाचे काम सुरू असून खोटेनगर याठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूला काळी खडी पसरण्यात आली असून हे काम टप्प्याटप्प्याने वाटिकाश्रमपर्यंत करण्यात येणार आहे.

दुभाजकाचे काम सुरू
महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाºया कंपनीचे कार्यालय बिबानगर येथे असून याठिकाणी सध्या दुभाजक बनवण्याचे काम सुरू आहे. महामार्गाचे काम संथगतीने सुरू असले तरी पावसाळ्यातही पावसाचा वेग पाहून हे काम सुरू राहणार असल्याचे कंपनीचे अभियंता भूपिंदर सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

रस्त्यापेक्षा बाहेरच्या मार्गाचाच जास्त उपयोग
महामार्गावरून जाणाºया वाहनांमध्ये एवढी स्पर्धा लागलेली असते की, अनेकवेळा ही वाहने महामार्गाशेजारी असलेल्या छोट्याशा जागेतूनही हाकली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना अन्य वाहनचालकांना करावा लागतो.

दादावाडीतील बायपासवर खड्डेच खड्डे
दादावाडी येथील बायपासवर मोठे खड्डे पडले असून अवजड वाहने, छोेटी वाहने अन् अरुंद रस्ता यामुळे याठिकाणी जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. काहीवेळा तर अवजड वाहने या बायपास रस्त्याच्या बाहेर वाहन घालतात. त्यामुळे मागून येणाºया वाहनांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागतो. याठिकाणी खड्ड्यात मध्यरात्रीच्या पावसामुळे पाणी साचले होते. त्यामुळे याठिकाणी रस्त्याला तळ्याचे रुप आले होते. मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाल्याने वाहनचालकांना त्यातूनच वाहने हाकावी लागत होती तर पादचाऱ्यांना चिखलातूनच वाट काढत चालावे लागत होते. दुपारच्या सत्रात वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाच याठिकाणचे काही खड्डे किरकोळ प्रमाणात बुजावण्याचे काम सुरू होते.

Web Title: Highway widening work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.