रेल्वे भाडेवाढीमुळे जळगावच्या केळीला दिल्ली आता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:48 PM2017-12-14T19:48:03+5:302017-12-14T19:54:04+5:30

रेल्वे भाडय़ात मिळणारी सवलत बंद झाल्याने दिल्ली सारख्या प्रचंड मोठी अशी हक्काची बाजारपेठ गमावण्याची वेळ, उत्पादकांवर आली असून केळीची दयनिय अवस्था झाली आहे.

hike in railway traffic of jalgaon banana | रेल्वे भाडेवाढीमुळे जळगावच्या केळीला दिल्ली आता दूर

रेल्वे भाडेवाढीमुळे जळगावच्या केळीला दिल्ली आता दूर

Next
ठळक मुद्देरेल्वेद्वारे होणा:या केळीच्या वाहतुकीऐवजी रस्तामार्गाने होणा:या वाहतुकीला चालना रायपनिंग व कोल्ड स्टोअरेजमुळे केळी पिकवणे व टिकवून ठेवण्यास या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होत आहे अपार मेहनत करून पिकवलेल्या केळीला बाजारपेठेअभावी दयनीय स्थितीचा सामना करावा लागत आहे.

ऑनलाईन लोकमत के:हाळे जि. जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी नवीन कृषीतंत्रज्ञान आत्मसात करीत केळीचा दर्जा आणि उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहे. बदलती बाजारपेठ व ग्राहकांच्या पसंतीस अनुकूल उत्पादन घेण्याचे कसबही शेतकरी दाखवत आहे. परंतु शेतक:यांच्या या मेहनतीवर रेल्वे भाडेवाढीमुळे पाणी फेरले गेले आहे, परिणामी जिल्ह्यातील केळीला आता दिल्ली दूर वाटू लागली आहे. अपार मेहनत करून पिकवलेल्या केळीला बाजारपेठेअभावी दयनीय स्थितीचा सामना करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 40 ते 50 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होते, यापैकी सर्वाधिक सुमारे 20 हजार हेक्टरवर केवळ रावेर तालुक्यात लागवड केली जाते. यानंतर यावल, चोपडा, मुक्ताईनगर व इतर तालुक्यात लागवड होते. रावेर तालुक्यातील शेतक:याची केळीशी पुर्वापार नाळ जुळली आहे. केळीचे भरपूर उत्पादन घेण्यात पारंगत असलेला या भागातील शेतकरी नफा- तोटय़ाचा विचार न करता सदैव केळी पिकालाच प्राधान्य देत आलेला आहे. नवनवीन प्रयोग करीत जास्तीत-जास्त उत्पन्न घेण्याचा त्याचा आजर्पयत प्रयत्न राहिला आहे. या भागातील शेतकरी पारंपरिक केळी उत्पादन घेण्यात अव्वलस्थानी होता. तो आजही आहे. आता ठिबक सिंचन प्रणाली आली आहे. तसेच उतिसंवर्धित (टिश्युकल्चर) बियाणेदेखील शेतक:यांना उपलब्ध आहेत. यामुळे केळीचे उत्पादन व दर्जा वाढला. तसेच खर्च सुद्धा वाढला. परंतु ज्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी हातभार लावला त्या संस्था तथा शासन स्तरावर केळी मालासाठी विश्वासार्ह व सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली आहे. या प्रकारामुळे उत्पादन होवून सुद्धा केळीतून अपेक्षीत पैसे हातात पडत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान, टिश्यूकल्चर केळी रोपांची लागवड करण्यासाठी लागणारे अर्थसाह्य आजही अल्प आहे. अशा रोपांची लागवड करण्याची इच्छा असली तरी मात्र ते करू शकत नसल्याची स्थिती आहे. यामुळे लहान शेतकरी रोपांच्या खालील दुय्यम दर्जाची बिजवाई (बेणे) लागवड करण्यातच समाधान मानत आहेत. केळी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर टिश्युकल्चर रोपांची विक्री कमी दरात केली जावी असा एक मतप्रवाह असून याबाबत विचार होणे गरजेचे आहे. दरम्यान, रायपनिंग व कोल्ड स्टोअरेजमुळे केळी पिकवणे व टिकवून ठेवण्यास या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होत आहे, त्यामुळे कच्चा माल वाहतुकीचे मार्गदेखील मोकळे झाले आहेत. घरपोचमुळे व भाडेवाढीमुळे राजधानी दुरावली.. एकेकाळी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दिल्ली शहरात आज रोजी केळी बाजारात सामसूम आढळून येत आहे. पूर्वी दररोज किंवा दिवसाआड भरली जाणारी रेल्वे व्ॉगन इतिहास जमा झाली आहे. रेल्वेद्वारे दिल्लीला गेलेली केळी त्यानंतर देशाच्या पूर्व भागातील व शेजारील व्यापारी इतर व्यापा:यांकरवी संबंधित ठिकाणी विक्री करायचे. परंतु हाताळणीमुळे मालाचा दर्जा खालावून विक्रीवर परिणाम व्हायचा. यावर उपाय म्हणून रेल्वेद्वारे वातानुकुलीत व्ॉगन्स् उपलब्ध करून देण्यात आल्या. यात 22 रॅक असायचे. मात्र रेल्वे भाडय़ात अनुदान नसल्यामुळे हे रॅक भरणे शेतक:यांना परवडणारे नसायचे म्हणून तो रॅक सुद्धा बंद करण्यात आला. त्यामुळे रेल्वेद्वारे होणा:या केळीच्या वाहतुकीऐवजी रस्तामार्गाने होणा:या वाहतुकीला चालना मिळाली. ट्रकद्वारे केळीची वाहतूक केल्यामुळे व्यापा:यांना माल घरपोच व चांगला दर्जा मिळतो, परिणामी रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला, त्यात भाववाढीची भर पडली आहे.

Web Title: hike in railway traffic of jalgaon banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.