विविध कार्यक्रमांनी हिंदी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:26 PM2019-09-15T23:26:53+5:302019-09-15T23:26:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस १४ रप्टेंबर रोजी जिल्हाभरात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस १४ रप्टेंबर रोजी जिल्हाभरात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून गाणे, संवाद, भित्तिपत्रके, वक्तृत्व सादरीकरण करून राष्ट्रीय भाषेचा अभिमान बाळगला.
कळमसरे येथे रेखाटली हिंदी साहित्यिकांची चित्रे
कळमसरे, ता. अमळनेर : येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. नाटीकाासह हिंदी गाणे, शेरो शायरी, हिंदीतून अध्ययन-अध्यापन, संवाद आदी उपक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी प्राचीन व आधुनिक नामवंत हिंदी साहित्यिकांची चित्रे रेखाटली. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींनी हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. शिक्षक राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. मुनाफ तडवी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक किसन सोनवणे अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक विलास इंगळे यांनी संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
चोपडा येथे ‘नारी शक्ती’वर वक्तृत्व स्पर्धा
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात ‘नारी शक्ती’ या विषयावर हिंदीतून वक्तृत्व स्पर्धा झाली. नारी शक्तीविषयी विद्यार्थिनींनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी हिंदी शिक्षक अशोक पावरा होते. अशोक साळुंखे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षिका एम.ए.पाटील, ए.बी.निंबाळकर, सी.टी.कदम, एम.एस.पाटील, जयश्री प्रवीण पाटील, संजय सोनवणे, अशोक साळुंखे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक निंबाळकर यांनी केले तर आभार ए.एम. साळुंखे यांनी मानले. वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धनाची शिक्षकांनी घेतली.
शेंदुर्णीत पोस्टर सादरीकरण
शेंदुर्णी, ता.जामनेर : येथील अप्पासाहेब रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.श्याम साळूंखे होते. प्रा.अप्पा महाजन यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी हिंदी पोस्टर सादर केले. भूमिका पाटील, प्रियंका जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ.आर.डी.गवारे यांनी प्रास्ताविक केले. गौरी शिवपूजे, कांचन भोई यांनी स्वागतगीत सादर केले. निलेश राठोड, वर्षा देशमुख, डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे प्रा.भूषण पाटील, डॉ.वसंत पतंगे, डॉ.दिनेश पाटील, डॉ.आजिनाथ जिवरग, प्रा.महेश पाटील, प्रा.निरुपमा वानखेडे उपस्थित होते.