हिंदी भाषा दिन : राष्ट्रगीतप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला जावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:08 PM2019-09-14T12:08:35+5:302019-09-14T12:09:05+5:30
हिंदी भाषा दिनानिमित्त तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया, हिंदीशिवाय नाही पर्याय
जळगाव : हिंदीचा वापर वाढतोय मात्र, क्षेत्र मर्यादीत आहेत़़ जागतिक स्तरावर भारताच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हिंदीशिवाय पर्याय नाही, म्हणून राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही सन्मान केला जावा, असा सूर हिंदीच्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे़ हिंदी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया दिल्या़ आपल्याला इंग्रजीचे ज्ञाने असणे जसे आवश्यक आहे,त्याप्रमाणे जीवनात यश मिळवायचे असेल तर राजभाषा ही शिकलीच पाहिजे. कारण आपल्या देशाची भाषा आणि संस्कृती महत्वाची मानली जाते , हिंदी भाषेचा प्रयोग खूप वाढला क्षेत्र मात्र मर्यादित आहेत़ ते व्यापक व्हायला हवेते़ व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात आजही इंग्रजीचा मोठा वापर होतो़ हिंदी भाषा व्यापारात व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यायला हवी़ उच्च शिक्षणकात केवळ साहित्यिकाचे अध्ययन पुरेसे नाही, त्या व्यतिरिक्त हिंदीला कामकजची भाषा, व्यावहारीक भाषाच्या रूपात शिकविणे गरजेचे आहे़ - डॉ़ तेजपाल चौधरी, हिंदीचे सेवानिवृत्त प्राध्यापक हिंदीसाठी सध्या पोषक वातावरण आहे़ राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रचार प्रसार होतोय़ आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळणे ही राष्ट्र अभिमानाची बाब आहे़ हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी वडिलांनही खारीचा वाटा उचलला आहे़ आऱ आऱ शाळेत वर्ग चालायचे, हिंदीसाठी सकारात्मक वातावरण आहे़ विद्यार्थ्यांनी भाषेकडे वळणे ही गरज आहे़ भाषा दुर्लक्षित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यानी भाषेमध्ये पीएच़डी करावी, अध्ययन करावे़ - डॉ. उषा शर्मा, आकाशवाणीच्या सेवानिवृत्त उद्घोषिका संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले़ आजही हिंदीला तिचं पद मिळालेलं नाही़ राष्ट्रीय, सामाजिक व वैश्विक एकतेसाठी हिंदी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे़ जागतिक स्तरावर हिंदी नेण्याचा प्रयत्न होत आहे़ मात्र देशात हिंदीची दयनिय अवस्था आहे़ इंग्रजी शाळांचे पेव सुटले असताना राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीला गौण समजलं जातय़ जगाला आपल्या संस्कृतिची ओळख करून द्यायची असेल तर हिंदी शिवाय पर्याय नाही़ राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला गेला पाहिजे़ -प्रा. डॉ़ सुरेश तायडे