राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर देशातील हिंदू अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:13 PM2018-05-27T23:13:08+5:302018-05-27T23:13:08+5:30

जळगावातील सभेत संभाजी भिडे गुरूजी यांची टीका

 The Hindu in the country failed on the basis of nationality test | राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर देशातील हिंदू अनुत्तीर्ण

राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर देशातील हिंदू अनुत्तीर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे हिंदूंना स्वार्थापलिकडे काही कळत नाही शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे व्रत जगलेहिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणार

जळगाव: देशातील हिंदू स्त्री-पुरूष राष्टÑीयत्वाच्या कसोटीवर अनुत्तीर्ण आहेत. आपली धरती, परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म याबाबत टोकाची क्रियाशिलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. हिंदूना स्वार्थापलिकडे काही कळत नाही. ही उणीव काढल्याशिवाय आपण राष्टÑ म्हणून उभे राहू शकणार नाही, अशी घणाघाती टीका श्री शिवप्रतिष्ठान ंिहंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी रविवार, २७ रोजी सायंकाळी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे आयोजित ‘३२ मण सिंहासन व खडा पहारा’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी केली.
भारत जगातील सर्वात संपन्न देश
भारत हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, तुर्कस्थान, नेपाळ, इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा सर्व भाग भारतखंडाचा भाग होता. त्यातील बराच भाग गळाला. तरीही भारत जगात लक्षावधी एकर सुपीक जमीन असलेला, मोठ्या संख्येने नद्या असलेला, पशुधन, जलसंपदा असलेला तसेच बुद्धीसंपन्न लोकांचा असा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र आपणच करंटे आहोत. मातृभूमीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव आपल्याला नाही. परदेशाचे आकर्षण वाटते. मात्र ‘नासा’ सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेच्या ११ जणांच्या संचालक मंडळात १० भारतीय हिंदू आहेत. जिनीव्हातील सर्वोच्च ताकत असलेल्या अणुभट्टीचे संचालन करणाºया शास्त्रज्ञांमध्ये ५३ टक्के हिंदू भारतीय आहेत. संगणक क्षेत्रातील ३७ टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातून (गंगासागर) युनेनियम, थोरीयम असलेल्या भागातून वाळू उपसण्याचा करार अमेरिकेशी केला. १८६२ ते १९८२ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून हे दुर्मिळ मुलद्रव्य नेले. आणि आपण त्यांच्याकडे युनेनियम, थोरीयमची भिक मागतो.
७६ राष्टÑांचे आक्रमण
जगातील १८७ राष्टÑांमध्ये आपले व्यवहारस्थान काय? शेकडो हजारो वर्ष परकीयांच्या आक्रमणात असलेला देश. ७६ राष्टÑांनी आक्रमण केले, असा आपला देश जगातील एकमेव आहे. असे का झाले? कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत? कशासाठी जगायचे? कशासाठी मरायचे? आपला शत्रू कोण? आपला मित्र कोण? याची जाणीवच नाही. असेल तरी स्वार्थापलिकडे जाणीव होतच नाही. हिंदूच्या रक्तात राष्टÑीयत्वाच्या जाणीवा पेटत्या नसतात, अशी टीका भिडे गुरूजींनी केली.

शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे व्रत जगले
चीन आपला शत्रू आहे. १९६५च्या युद्धात १ लाख ८४ हजार चौरस मैल भूभाग चीनने बळकावला. आजही रोजच आपल्याला आव्हान देत असतो. मात्र आपण ना पुरूष ना स्त्री असे जीवन जगतो. पाकिस्तान रोज आपले सैनिक मारत असताना आपण मैत्रीचा हात पुढे करतो. १४ आॅगस्टला वाघा सीमेवर काही लोक मिठाई वाटायला जातात. हिंदूना स्वार्थापलिकडे काही कळत नाही. ही उणीव काढल्याशिवाय आपण राष्टÑ म्हणून उभे राहू शकणार नाही. अशा या देशात ३५० वर्षांपूर्वी शहाजीराजे व जिजामाता यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी विडा उचलला. शहाजी राजे अत्यंत प्रखर होते. मात्र एकाकी लढत देऊनही त्यांना अपयश आल्याने शिवाजी महाराजांवर त्यांनी ही जबाबदारी सोपविली.स्वार्थासाठी भांडण्यात समाज गुंग असताना शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. सिंहासन स्थापन केले. शिवाजी महाराज जीवन जगले नाहीत तर अंगिकारलेले हिंदवी स्वराज्याचे व्रत जगले. वय वर्ष १४ ते ५० या ३६ वर्षांच्या कालखंडात सर्व शत्रुंना आव्हान देत २८९ लढाया केल्या. त्यापैकी केवळ ७ वेळा ते पराभूत झाले. तर संभाजी महाराज ‘बाप से बेटा सवाई’ असे होते. त्यांनी शिवाजी महाराजांनंतर अवघ्या पावणे नऊ वर्षात १३४ लढाया लढल्या. त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. शिवाजी महाराजांचे सप्तगंगा, सप्त सिंधू मुक्त करण्याचे, काशी विश्वेश्वराचे मंदिर मुक्त करण्याचे स्वप्न होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी राज्य दुप्पट वाढविले. तर त्यांच्यानंतर मराठा सरदारांनी नेतृत्व नसातनाही धडक मारत दिल्लीवर झेंडा फडकविला.
हिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणार
संभाजी महाराज मोगलांच्या ताब्यात सापडल्यावर रायगडावरील सिंहासनाचे तुकडे केले. ते सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकºयांनी ४ जून २०१७ रोजी केला आहे. त्यानुसार ज्या दिवशी सिंहासन संस्थापित होईल, त्या क्षणापासून दर दिवशी राज्यातील ३८ जिल्ह्यातील ३९४ तालुक्यातून किमान २ हजार धारकरी रायगडावर महाराजांच्या दर्शनाला मावळ्यांच्या वेशात पायात वहाण न घालता जातील. यातून शिवरायांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जगणारा खडा पहारा निर्माण करणार आहे. हिंदूंचे नेतृत्व करणारा महाराष्टÑ उभा करणार असल्याचे भिडे गुरूजी यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातूनही यात सहभागाचे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

भिमा-कोरेगाव दंगलप्रकरणी भिडे गुरूजींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या सभेला विरोध होण्याची तसेच विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आंबेडकर मार्केट परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

Web Title:  The Hindu in the country failed on the basis of nationality test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.