हिंगोणे ग्रामस्थांचे गुरुवारपासून नदीपात्रात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:34 PM2019-01-31T22:34:11+5:302019-01-31T22:34:26+5:30
कारवाई करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष
चाळीसगाव : वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हिंगोणे येथील ग्रामस्थ १ फेबु्रवारी रोजी सकाळी १० वाजता गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रात आमरण उपोषणास बसणार आहे.
हिंगोणे गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातून २२ रोजी पहाटे ३ वाजता माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी व त्यांचे दोन साथीदारांना जेसीबी व डंपरने वाळू उपसा करीत असताना गावातील ग्रामस्थांनी प्रशासनांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. वर्षभरापासून वाळूचा उपसा सुरू असून ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन तसेच ग्रामपंचायतीचे ठराव देऊनदेखील ठोस कारवाई वाळू माफियांवर केली गेली नाही. या वाळू माफियाविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली होती. ती मागणी न झाल्याने गावतील ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच अरविंद चव्हाण, बाळासाहेब पाटील, सोसायटी चेअरमन सयाजी पाटील यांनी दिली.