कोळन्हावी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 16:50 IST2018-01-19T16:48:40+5:302018-01-19T16:50:29+5:30
कोळन्हावी येथे निवृत्ती भागा सोळंके (वय ५८) यांनी गळफस घेऊन आत्महत्या केली.

कोळन्हावी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देगावाबाहेरील खळ्यात आढळला मृतदेहआत्महत्येचे नेमके कारण आले नाही समोरयावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
आॅनलाईन लोकमत
डांभुर्णी, ता.यावल, दि.१९ : येथून तीन कि.मी.वरील कोळन्हावी येथे निवृत्ती भागा सोळंके (वय ५८) यांनी गळफस घेऊन आत्महत्या केली. १९ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेरील खळ्यामधील छताच्या दांडीला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही घटना उघड झाली.
आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नाही. भागवत दगा सोळंके यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहे.