मुक्ताबाई कोथळीतच लुप्त झाल्याचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 12:13 AM2017-01-17T00:13:19+5:302017-01-17T00:13:19+5:30
आऱएऩ शुक्ल : 1966 मध्ये वैज्ञानिक प्रयोगाद्वारे झाले सिद्ध
मुक्ताईनगर : 700 वर्षापूर्वी वीज कोसळून लुप्त झालेली आदिशक्ती मुक्ताई खरोखर 1966 मध्ये विजेसह लुप्त झाल्याचे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती पुणे येथील वैज्ञानिक व संशोधक प्रा़डॉ़आऱएऩ शुक्ल यांनी नवीन मुक्ताई मंदिरात आयोजित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रम प्रसंगी दिली.
नवीन मुक्ताई मंदिरात मंगळवारपासून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे.
सोमवारी प्रा़ आऱ एऩशुक्ल यांचे प्रवचन झाले.
संत मुक्ताईच्या संदर्भात अद्ययावत संशोधक माहिती त्यांनी दिली.
त्यांनी आपल्या विश्व चैतन्याचे विज्ञान या पुस्तकात हा संदर्भ दिला आहे.
संशोधनासाठी त्या काळी त्यांना शिखर बँकेचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव पाटील व माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसंगी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, हभप रवींद्र हरणे, उद्धव जुणारे व भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)
संत साहित्यात मुक्ताई वीज पडून लुप्त झाली, असा उल्लेख असल्याने ती वीज नेमकी कुठे व कधी पडली ? याचे संशोधन त्यांनी करायचे ठरवले. 1966 मध्ये डॉ.धुंडिराज पाठक, डॉ़शुक्ल व अंतुर्लीकर यांनी दोन वर्षे कोथळी व मेहुण येथे विज्ञानाच्या दहा मुद्यांचा अभ्यास केला. त्यात वीज पडली ती जागा, तेथील माती व जल परीक्षण केले. तापमान व कंपणाच्या नोंदी केल्या. या अभ्यासावरून मुक्ताई कोथळी येथेच अंतर्धान पावल्याचे प्रयोगाअंती सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यासाठी तत्कालीन स्व.प्रल्हादराव पाटील,स्व.मधुकरराव चौधरी यांचे सहकार्य लाभल्याचे शुक्ल म्हणाले.