पाचोऱ्यात हिवरा नदीला आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:15+5:302021-09-02T04:34:15+5:30
हिवरा नदीवरील धरण हे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. हे लक्षात घेता नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने २४ ...
हिवरा नदीवरील धरण हे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. हे लक्षात घेता नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने २४ तासांच्या आत नदी, नालापात्रातील व किनाऱ्यालगतच्या पूरपातळी कक्षेच्या आतील भागाचे आपले अतिक्रमण काढून घेऊन गुरे, ढोरे, जनावरे, नागरिक यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे व सतर्क राहावे, असा इशारादेखील दिला आहे. पाचोरा नगर परिषदेने सद्य:स्थितीत सुरू असलेल्या व हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढणार असून संभाव्य जोरदार किंवा संततधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीस आणि नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसून शहरातील जुन्या, पडाऊ झालेल्या इमारती, घरे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वैयक्तिक आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची पूर्णत: जबाबदारी आपली स्वत:ची असून नदीपात्र आणि पडाऊ घरांपासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनदेखील नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्याकडून करण्यात आले आहे.