विविध मागण्यांसाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:03 PM2019-11-26T22:03:52+5:302019-11-26T22:03:56+5:30
चाळीसगाव : जन आंदोलन समितीचे आंदोलन
चाळीसगाव : जन आंदोलन खान्देश विभाग समितीच्या वतीने २६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर शेख, आनंदा गायकवाड, मुकेश नेतकर, संभाजी जाधव व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाली होते. आंदोलनस्थळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेनेचे महेंद्र पाटील, भीमराव खलाणे व इतर पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तहसीलदार अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी समितीतर्फे राज्यपाल यांना पाठविण्यासाठीचे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आरएसएस या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात यावी, सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना केजी टु पीजी मोफत शिक्षण देण्यात यावे, सरकारी कंपन्यांची विक्री थांबविण्यात यावी किंवा संसदेचे खाजगीकरण करावे, अंबानी अडानी व इतर भांडवलदार याच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करावे, बेरोजगारी भत्ता किमान १८००० देण्यात यावा, शेतकऱ्यांना किमान हेक्टरी रू. ५०००० नुकसान भरपाई द्यावी, विजेचे २०० युनिट पर्यंत बिल मोफत देण्यात यावे, विद्यापीठ व सरकारी अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त हॉस्पीटलचे बांधकाम करण्यात यावे, जिल्हा परिषदच्या शाळा अत्याधुनिक त्करून इंग्रजी माध्यमाच्या शाळात रूपांतर करण्यात यावे आदी मागण्या आहेत.