हाती बेळणी अन झेलता. चला आंबे झाडावरील कैऱ्या उतारणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:33+5:302021-06-24T04:12:33+5:30

पुरण पोळीसंगे आंब्याचा रसाचा स्वाद खमंग जेवणाने घरोघरी चाखला जात आहे. कैरीचे लोणचे बनवण्याचा हंगाम घरोघरी सुरू झाला आहे. ...

Holding the rolling pin in hand. Let's go to the mango tree | हाती बेळणी अन झेलता. चला आंबे झाडावरील कैऱ्या उतारणीला

हाती बेळणी अन झेलता. चला आंबे झाडावरील कैऱ्या उतारणीला

Next

पुरण पोळीसंगे आंब्याचा रसाचा स्वाद खमंग जेवणाने घरोघरी चाखला जात आहे. कैरीचे लोणचे बनवण्याचा हंगाम घरोघरी सुरू झाला आहे. त्यामुळे आंबे उतरविण्याचे काम आपल्या कलेने अन‌् जीव धोक्यात घालून शेतकरी, मजूर करताना दिसत आहेत. हाती बेळणी अन‌् झेलता. चला आंबे झाडावरील कैऱ्या उतरणीला, असे चित्र भडगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यात गावरानी जातीचे विविध आंब्यांची झाडे, आमराया आहेत. यंदा भडगाव तालुक्यात आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर आला होता. मात्र वेळोवेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसासह वादळाने झाडावरील आंब्यांची गळती होत निम्या हंगामाचे नुकसान झाले आहे.

आंबे शाकी लागल्याने अक्षय तृतीया सणापासून गावरानी कैऱ्या उतरविण्यास सुरुवात झाली आहे. महिला लोणचे बनवण्यासाठी बरण्या, मसाला आदी साहित्य बाजारपेठेतून घेताना नजरेस पडत आहेत.

Web Title: Holding the rolling pin in hand. Let's go to the mango tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.