सुख शांती समृद्धी प्रदाता होळी उत्सव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:35 AM2020-03-09T11:35:41+5:302020-03-09T11:35:53+5:30
प्रसाद धर्माधिकारी । नशिराबाद : मनातील मतभेद विसरून वाईट विचारांची होळीप्रमाणे आगीत राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले ...
प्रसाद धर्माधिकारी ।
नशिराबाद : मनातील मतभेद विसरून वाईट विचारांची होळीप्रमाणे आगीत राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. सोमवारी रात्री ११ वाजून १८ मिनिटांपर्यत पौर्णिमा आहे. त्यामुळे सोमवार ९ मार्च रोजी होळी उत्सव साजरा होत आहे तर मंगळवारी १० रोजी धुलीवंदन आहे. त्यासाठी जोरदार तयारी ग्रामीण भागात सुरू आहे.
होळी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशात वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा प्राप्त आहे. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून ते पंचमी पर्यंत या पाच ते सहा दिवसांत कुठे दोन तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव दुसरा दिवशी सुरू होणाºया वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सवारंभ असेही म्हणण्यात येते. या उत्सवाला अनन्य महत्त्व आहे.
होळीच्या दुसºया दिवशी होळीची राख अंगाला लावायची स्नान करायचे त्यामुळे मानसिक व्यथा, चिंता व रोग नाहीसे होतात अशी भावना आहेत. फाल्गुन वद्य पंचमीला एकमेकांना रंग लावून रंगपंचमी उत्सव साजरा करतात. होळीसाजरी करण्यामागेदेखील एक प्राचीन इतिहास आहे. होळीचे पूजन करून पाणी फिरवून प्रदक्षिणा करावी नारळ अर्पण करावे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी.