हिवताप कर्मचाऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:54 AM2019-12-13T11:54:22+5:302019-12-13T11:54:58+5:30

जळगाव : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे हस्तांतरण करण्याच्या शासन निर्णयाची होळी करून हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात ...

Holi of Govt | हिवताप कर्मचाऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी

हिवताप कर्मचाऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी

Next

जळगाव : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे हस्तांतरण करण्याच्या शासन निर्णयाची होळी करून हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला़ यासंदर्भात हिवताप कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी जिल्हाभरातील हिवताप कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली़
१८ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील ३५० कर्मचारी सहभागी होणार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ६५ वर्षांपासून हिवताप योजनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे, ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून राज्याच्या सहयोगाने जनतेसाठी आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करते़ राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडून याबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे़ यावेळी कर्मचारी संघटनेचे व समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष आऱ एऩ सोनार, जिल्हाध्यक्ष विजेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस विजय वानखेडे, उपाध्यक्ष सी़ एल़ चौधरी, आऱ एस़ सूर्यवंशी, एम़ सी़ जाधव, आऱ एस़ शितोळे, यु़ एस़ सोनवणे, कार्याध्यक्ष बी़ एऩ पांडे, कोषाध्यक्ष व्हि़ एम़ लोणारी, सल्लागार पी़ एस़ भदाणे, एस़ एस़ चौधरी, डी़ बी़ पाटील, आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते़

Web Title: Holi of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव