पाचोरा येथे शिवसेनेने केली कर्जमाफीच्या आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 04:22 PM2017-06-19T16:22:35+5:302017-06-19T16:22:35+5:30
शासनाच्या जाचक निकषांमुळे केवळ 10 टक्के शेतक:यांना लाभ
Next
ऑनलाईन लोकमत
पाचोरा,दि.19- शासनाने तत्वत: कर्जमाफी जाहीर करून जाचक निकष लावून आदेश काढला. हा आदेश काढून शासनाने शेतक:यांची चेष्टा केली असल्याचा आरोप करीत पाचोरा येथे शिवसेना आमदार किशोर पाटील व शेतक:यांनी सोमवारी या शासन आदेशाची होळी केली आहे.
शासनाने शेतक:यांना कजर्माफी जाहीर केली आहे. मात्र कजर्माफी करीत असताना त्यात जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के शेतक:यांना याचा लाभ होणार आहे. शासनाच्या या जाचक निकषाचा निषेध म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार आर. ओ.पाटील, तालुका प्रमुख दीपक राजपूत, जिप सदस्य पद्मसिंग पाटील, रमेश बाफना ,नगराध्यक्ष संजय गोहिल, शहरप्रमुख किशोर बारवकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतीश चेडे, राम केसवणी, बापू हटकर , गणेश पाटील, जितेंद्र पेंढारकर यांचेसह शेतकरी ,शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते