पवित्र रमजान महिन्याला उद्यापासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:57+5:302021-04-13T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रमजान महिन्याचे चंद्रदर्शन सोमवारी रात्री न झाल्याने पवित्र रमजान पर्वाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रमजान महिन्याचे चंद्रदर्शन सोमवारी रात्री न झाल्याने पवित्र रमजान पर्वाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. पहिली तरावीहची नमाज मंगळवारी रात्री होईल व रोजा (उपवास) बुधवारी होईल, असे जळगाव रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी घोषित केले.
सोमवारी संध्याकाळी जामा मशिद येथे रूहते हिलाल कमिटीची सभा झाली. यावेळी शहर काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी चंद्र दर्शनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. या सभेत मौलाना जाकिर देशमुख, हाफिज रेहान बागवान, हाफिज वसीम पटेल, मौलाना जुबेर, सय्यद चाँद, मुकीम शेख, अश्फाक बागवान, अनिस शाह, अॅड. सलीम शेख, ताहेर शेख, इक्बाल बागवान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी केले.