तापी पूर्णा संगमावरील पवित्र जल अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:24 PM2020-08-03T19:24:00+5:302020-08-03T19:25:50+5:30

पवित्र जल व माती सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले.

Holy water from Tapi Purna confluence handed over to Shriram Temple Trust in Ayodhya | तापी पूर्णा संगमावरील पवित्र जल अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द

तापी पूर्णा संगमावरील पवित्र जल अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द

Next
ठळक मुद्देअयोध्येत आचार्य जनार्दन महाराज पोहोचलेअयोध्येत समिती सदस्यांची घेतली भेट

वासुदेव सरोदे
फैजपूर : येत्या दि ५ आॅगस्ट रोजी ५०० वर्षांची बहुप्रतीक्षा संपवून सर्वांचे श्रद्धास्थान श्रीरामाच्या अयोध्येत पायाभरणी होत आहे. त्यासाठी खानदेशातील तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल व आदिशक्ती मुक्ताई समाधी स्थळावरील माती अयोध्येत मंदिर भूमिपूजनासाठी पोहोचली आहे. ते पवित्र जल व माती सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले.
श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी खानदेशातून आचार्य जनार्दन महाराज यांना निमंत्रण मिळाल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २ रोजी सकाळी आचार्य जनार्दन महाराज यांनी अयोध्येकडे प्रस्थान केले. त्यांच्यासोबत इंदूर येथून राधेबाबा हे आले होते. सोमवारी दुपारी चार वाजता त्यांचे अयोध्येत आगमन झाल.
आचार्य जनार्दन महाराज यांनी माहिती देताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता व भक्तीभावाने वातावरण आहे. त्याचप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्थाही आहे. श्रीराम मंदिर ट्रस्टकडून मिळालेले निमंत्रण हेच प्रमाण समजून प्रवेश दिला जात आहे. आचार्य जनार्दन महाराज व त्यांच्यासोबतचे भक्तगण यांची अयोध्येतील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीच्या आश्रमात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दुपारी अयोध्येत पोहोचल्यानंतर मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यालय असलेल्या कारसेवक पुरममध्ये आचार्य जनार्दन महाराज यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज, महामंत्री चंम्पतराय यांची भेट घेऊन तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल व संत मुक्ताई समाधीस्थळाची पवित्र माती तसेच रामभक्तांनी दिलेले दान ट्रस्टकडे सुपूर्द केले. यावेळी इंदूर येथील राधेबाबा यांचीही उपस्थिती होती.

Web Title: Holy water from Tapi Purna confluence handed over to Shriram Temple Trust in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.