जळगाव जिल्ह्यातील ३२ हजार लाभार्थ्यांना घरकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:20+5:302021-06-09T04:21:20+5:30
जळगाव : जिल्हाभरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३२ हजार १०७ लाभार्थ्यांना घरकूल मिळाले आहे. या योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी राहिली ...
जळगाव : जिल्हाभरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३२ हजार १०७ लाभार्थ्यांना घरकूल मिळाले आहे. या योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी राहिली असून राज्यात जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून या योजनेचे प्रकल्प संचालक म्हणून तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांच्याकडे पदभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर.लोखंडे यांच्याकडे पदभार आलेला आहे. जिल्ह्यात ६८ हजार ९४ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५४ हजार ३५४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील ३२ हजार १०७ घरकुले पूर्ण झाली असून २२ हजार घरकुलांची कामे सुरू आहेत.
यासह या योजनेअंतर्ग भूमीहिनांना घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यात जिल्हाभरात अशा ११ हजार ८४७ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून ७ हजार ९६५ लाभार्थ्यांना जागा देण्याबाबतीची प्रक्रिया सुरू आहे.