गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:56+5:302021-07-25T04:14:56+5:30

विजयकुमार सैतवाल बांधकाम साहित्याच्या दुकानांवर वेळेचे बंधन : वाळू लिलाव मुदत संपल्याने तुटवडा स्टार - ९६४ जळगाव : सिमेंट, ...

Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true? | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?

Next

विजयकुमार सैतवाल

बांधकाम साहित्याच्या दुकानांवर वेळेचे बंधन : वाळू लिलाव मुदत संपल्याने तुटवडा

स्टार - ९६४

जळगाव : सिमेंट, स्टील यासह इतर बांधकाम साहित्याच्या भावात वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. यात गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले असले तरी बांधकाम साहित्य महाग होत असल्याने त्याचा परिणाम घरांच्या किमतीवरही होत आहे. त्यामुळे सामान्यांचे घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार, अशी परिस्थिती आल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

- घरांच्या किमतीच्या बाबतीत विचार केला तर मध्यवर्ती ठिकाण अथवा घराच्या आसपास सुविधा उपलब्ध असल्यास त्या घरांच्या किमती अधिक आहेत.

- मात्र शहरापासून लांब गेले तसे घरांच्या किमती कमी होत आहे. यामध्ये मोहाडी रोड, गिरणा पंपिंग रोड, कोल्हे हिल्स परिसर या भागात असलेल्या घरांच्या किमतीच्या तुलनेत इतर ठिकाणी घरांच्या किमती अधिक आहेत.

असे आहेत गृहकर्ज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया - ७.५० टक्के

बँंक ऑफ इंडिया - ६.८५ टक्के

बँक ऑफ महाराष्ट्र - ७.०५ टक्के

एचडीएफसी - ६.७५ टक्के

आयसीआयसीआय - ६.७५ टक्के

बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच!

साहित्य- २०१८-२०१९-२०२०-२०२१(जुलै)

सिमेेंट- २९०-३१०-३३०-३५०

विटा- २४००-२५००-२७००-२८००

वाळू- २७००-२८००-३०००-३५००

खडी- १९००-२०००-२१००-२४००

स्टील- ३८००-३९००-४०००-५४००

साहित्य विक्रेते म्हणतात...

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये सिमेंट व स्टीलचे दर अधिक वाढले आहेत.

- अब्बास मकरा, बांधकाम साहित्य विक्रेते

घर घेणे कठीणच

बँकांकडून मिळणाऱ्या गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्याने व कर्जही मिळत असल्याने दिलासा आहे. मात्र घरांच्या किमती आवाक्याबाहेर जात असल्याने घराचे स्वप्न पूर्ण कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.

- सुशील लकडे

गेल्या अनेक दिवसांपासून घर घेण्याचे नियोजन आहे. मात्र घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे घर घेणे कठीण होत आहे.

- प्रशांत लिंगायते.

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.