होमिओपॅथिक उपचार आता मिळणार एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:13+5:302021-01-17T04:15:13+5:30
फोटो आहे .... लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सुपरिचित होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. रितेश आर. पाटील हे ...
फोटो आहे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सुपरिचित होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. रितेश आर. पाटील हे सुलभ, सुरक्षित अन् समूळ हे चिकित्सा पद्धतीचे सूत्र अंगीकारत जळगावात २००५पासून रामनंदा होमिओपॅथिक सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सेवा देत आहेत.
या चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून डॉ. पाटील यांनी आजवर अनेक लहान मुले-मुली, महिला प्रौढ, ज्येष्ठांना सायटिका, पायाची व कमरेची नस ओढली जाणे, किडनी स्टोन-मूतखडा, ॲसिडिटी-आम्लपित्त, डिओलोसिस-मानेच्या मणक्यांतील गॅप, पाईल्स, फिशर, मूळव्याध, दर्यचिकित्सा, मायग्रेन-अर्धशिशी, डोकेदुखी आदी व्याधींसह साथीच्या रोगांवरही योग्य उपचारांद्वारे रुग्णांना ठणठणीत केले आहे. हे उपचार करताना रामनंदा होमिओपॅथिक सेंटर नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अग्रेसर राहिले आहेत. त्याच अनुषंगाने डॉ. रितेश पाटील यांनी आता खान्देशवासींसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील रुग्णांसाठी ‘ॲप’ उपलब्ध करून दिले असून, ते रुग्णास Ramnanda Homeopathy वरून डाऊनलोड करता येईल. यामुळे रुग्णाला घरी बसून डॉ. रितेश पाटील यांच्याशी आजारासंदर्भातील संवाद तसेच औषधींबाबत मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच ऑनलाईन क्लिनिकद्वारे घरपोच औषधीही मिळविता येतील. पेमेंटसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
होमिओपॅथिक क्षेत्रात सर्वप्रथम ऑनलाईन रुग्णसेवा देणारे ‘रामनंदा ऑनलाईन होमिओपॅथी क्लिनिक’ हे खान्देशातील पहिलेच आहे. नागरिकांनी या ऑनलाईन सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे ‘रामनंदा ऑनलाईन होमिओपॅथी क्लिनिक’तर्फे कळविण्यात आले आहे. (वा. प्र.)