अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 03:32 PM2019-12-17T15:32:50+5:302019-12-17T15:34:17+5:30
रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
अमळनेर, जि.जळगाव : रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. या पर्समध्ये रोख रक्कम, दागिने व चांदीच्या देवाच्या मूर्ती मिळून १२ हजार रुपयांचा ऐवज होता.
मोहम्मद शफी तेली (रा.फरशी रोड, अमळनेर) या रिक्षाचालकाने माधवी अशोक गायकवाड (रा.हनुमाननगर, अमळनेर) यांना पाचपावली मंदिराजवळून प्रवाशी म्हणून बसवले. मात्र महिला आपली दागिने व पैसे तसेच एटीएम असलेली पर्स त्यातच विसरली.
रिक्षाचालकाने पर्स न उघडता पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याशी संपर्क साधून हरवलेली पर्स त्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम डेबिट कार्ड असे प्रामाणिकपणे महिलेशी संपर्क साधून परत केले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.