दिव्यांग बांधवांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:40+5:302020-12-06T04:16:40+5:30
फोटो नंबर १ शेतकरी आंदोलनाला टाळ-मृदुंग वाजवून पाठिंबा भुसावळ : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत, यासाठी दिल्ली ...
फोटो नंबर १
शेतकरी आंदोलनाला टाळ-मृदुंग वाजवून पाठिंबा
भुसावळ : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत, यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनास टाळ-मुदुंग वाजवत जाहीर पाठिंबा भुसावळातीत शेतकऱ्यांनी दिला. केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात ३ कायदे आपल्या बहुमताच्या जोरावर मंजूर केले. या कायद्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भरडून निघणार आहेत. हे कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत, यासाठी दिल्लीजवळ देशभरातील शेतकरी संघटना व शेतकरी एकवटून गेल्या ८ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. अशा या केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. केंद्र सरकारने तातडीने हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी देवेंद्र वराडे, भिकाजी बाणाईत, सचिन जगताप, चेतन कपिले, सौरभ फेगडे, जगदीश कोल्हे उपस्थित होते.
- भुसावळातील शेतकरी टाळ व मृदुंग वाजवत अनोख्या पद्धतीने पाठिंबा देताना. (छाया - श्याम गोविंदा)