रावेर तालुक्यातील निंभोरा येथे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 04:47 PM2018-11-30T16:47:24+5:302018-11-30T16:48:11+5:30
निंभोरा, ता. रावेर , जि.जळगाव : प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांच्याप्रमाणे निस्वार्थ, काटेकोर, प्रामाणिक, सामाजिक व ...
निंभोरा, ता.रावेर, जि.जळगाव : प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांच्याप्रमाणे निस्वार्थ, काटेकोर, प्रामाणिक, सामाजिक व प्रशासकीय, शैक्षणिक कार्याचा आदर्श घेऊन कार्य केल्यास हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व प्रगतीशील शेतकरी कडू धोंडू चौधरी यांनी केले.
ऐनपूर येथील रहिवाशी व बलवाडी येथील मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांना मुख्याध्यापक संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन त्यांनी आपली भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक व स्वागत संयोजक अरुण गिरडे यांनी केले. प्रारंभी मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच डिगंबर चौधरी, प्रल्हाद बोंडे, रोहिदास ढाके, बी.के. येवले, नितीन दोडके, बी.डी. गिरडे, सत्कारार्थी एन. व्ही. पाटील व कडू चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. आर. जे.पाटील, मनोहर पाटील, काशिनाथ बोरसे, शिवाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, नथुराम घुले, सचिन महाले, मुन्ना पिंजारी, शिवाजी गिरडे, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, रामभाऊ दोडके, अंबादास शिंपी, भरत महाले, चंद्रकांत गवळी, बापू कोळी, स्वप्नील गिरडे, आशिष बोरसे, ललित दोडके व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन राजीव बोरसे यांनी केले. आभार अमोल गिरडे यांनी मानले.