मारवड पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 04:00 PM2020-01-12T16:00:34+5:302020-01-12T16:01:41+5:30
पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला.
मारवड, ता.अमळनेर, जि.जळगाव : येथील पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला. अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे ५२व्या पोलीस पाटील दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. यात उत्कृष्ठ कामगिरी करणारे पोलीस पाटील गोविंदा पाटील जैतपीर, अशोक शिरसाठ जळोद, प्रवीण पाटील झाडी यांचा गौरव व सेवानिवृत्त पोलीस पाटील शालीक पाटील सात्री यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस पाटील संघटनेचे खान्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला व जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष विलासराव पाटील, कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, सचिव उल्हास लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप तिवारी, उपाध्यक्ष प्रवीण गोसावी, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश पाटील(धानोरा), नवल धनगर (वडती) चोपडा, विजय भिका पाटील खदे (चोपडा), शरद पाटील चाळीसगाव, हेमराज पाटील चाळीसगाव, तुकाराम शिवरे पारोळा, पारोळा तालुका अध्यक्ष दिनकर पाटील, तालुकाध्यक्ष भानुदास पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष लीला पाटील, जिल्हा महिला संघटक कविता पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, ज्येष्ठ सल्लागार दिलीप पाटील, जिल्हा सोशल मीडियाप्रमुख तुकाराम पाटील, अमळनेर तालुका सचिव लखीचंद पाटील, तालुक्यातील विजय पाटील, रवींद्र पाटील, रवी पवार, संजय पाटील, अंकुश पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन साने गुरुजी हायस्कूलच्या शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी केले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा सदस्य भाऊसाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर तालुका उपाध्यक्ष गोविंदा पाटील, सुभाष पाटील, प्रदीप चव्हाण व उमेश पाटील, गजेंद्र पाटील, चेतन पाटील, केशव पाटील यांनी सहकार्य केले. जिल्हा सचिव उल्हास लांडगे यांनी आभार मानले.
यावेळी अमळनेर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.