न्हावी येथे सद्गुरू स्मृती महोत्सवात साफसफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:38 PM2019-12-28T18:38:53+5:302019-12-28T18:41:55+5:30
सद्गुरू स्मृती महोत्सवात शनिवारी शहरातील पुरोहितांसह साफसफाई कर्मचाऱ्यांचा संत व महाराजश्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे सद्गुरू स्मृती महोत्सवात शनिवारी शहरातील पुरोहितांसह साफसफाई कर्मचाऱ्यांचा संत व महाराजश्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १०१ संत व भक्तांनी रक्तदान केले.
२४ ते ३० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या सद्गुरू स्मृती महोत्सवात विविध कार्यक्रम होत आहेत. देश-विदेशातील हरिभक्त तसेच देशभरातील अनेक संतांच्या उपस्थितीत आध्यात्मिक उपक्रमांसह सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जात आहेत.
२८ रोजी महोत्सवाचा पाचवा दिवस होता. रक्तदान शिबिरात १०१ संत व भक्तांनी रक्तदान केले. याशिवाय न्हावी गावातील ब्राह्मणांचा त्याचप्रमाणे गावातील साफसफाई करणारे कर्मचाऱ्यांचा संत व महाराजश्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, महाराजश्री यांच्या आज्ञेने, सद्गुरू शास्त्री धर्मप्रसादजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजींच्या आशीवार्दाने सद्गुरू शास्त्री भक्तिकिशोरदासजींनी गुजराती वचनामृत ग्रंथाचा मराठी भाषेमध्ये अनुवाद केला. सोबतच श्राव्य म्हणून वचनामृत रेकॉर्डिंग करून पेन ड्राईव्ह स्वरूपात आचार्यश्री व संतांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला.
दुपारच्या सत्रामध्ये कथा निरुपण झाले. रात्री श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदा येथील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम केला. हा कार्यक्रम मनोरंजनात्मक नव्हे परंतु मार्गदर्शनात्मकसुद्धा होता.
याप्रसंगी परमपूज्य धर्म धुरंधर १००८ आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज, पूज्या मातोश्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्म प्रसाददासजी, उपाध्यक्ष शास्त्री ज्ञानप्रकाशदासजी (गांधीनगर), के.पी. स्वामी (भावनगर), माधव स्वामी (नाशिक), बालमुकुंद स्वामी, हरीवल्लभ स्वामी, जे.पी. स्वामी (वडोदरा), विष्णू स्वामी (भावनगर), निर्लेप शास्त्री (बोरसद), सार्थक नेहेते (क्राइम ब्रँच, नागपूर), हरिभाऊ जावळे (माजी आमदार) आदी महानुभाव उपस्थित होते.