पंधरवड्यानिमित्त नेत्रदात्यांचा सन्मान
By admin | Published: September 8, 2015 05:35 PM2015-09-08T17:35:36+5:302015-09-08T17:45:33+5:30
नंदुरबारमध्ये नेत्रदान करणार्या व संकल्प करणार्यांचा नेत्रदान पंधरवड्यानिमित्त गौरव करण्यात आला.
नंदुरबार : नेत्रदान करणार्या व संकल्प करणार्यांचा नेत्रदान पंधरवड्यानिमित्त गौरव करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १६८जणांनी नेत्रदान केले असून ५00जणांनी संकल्प केला आहे.
नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानिमित्त नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार जिल्हा सार्वजनिक सेवा समितीतर्फे व कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, छाया जैन प्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.अनिल शाह होते. डॉ.प्रसाद सोनार, डॉ.जय देसाई, जगदाळे, डी.डी. पाटील, उमेश पाडवी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.शाह यांनी नेत्रदानाची आवश्यकता व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.सोनार यांनी मरणोत्तर देहदानाविषयी माहिती दिली. अंधश्रद्धा व गैरसमजुती यासंदर्भात आवाहन केले. गेल्या वर्षभरात २९ नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले, त्यांच्या नातेवाइकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी नेत्रदानाविषयीच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.