शेतकऱ्यांसोबतच उद्योजकांचाही सन्मान - खासदार उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:08 AM2019-06-03T00:08:34+5:302019-06-03T00:08:42+5:30

औद्योगिक वसाहतीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही

Honorary entrepreneurs along with farmers | शेतकऱ्यांसोबतच उद्योजकांचाही सन्मान - खासदार उन्मेष पाटील

शेतकऱ्यांसोबतच उद्योजकांचाही सन्मान - खासदार उन्मेष पाटील

Next

जळगाव : शेतक-यामुळे ज्या प्रमाणे सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याप्रमाणे उद्योगांमुळे रोजगाराचीही निर्मिती होऊन आर्थिक सुबत्ता येते, त्यामुळे उद्योगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली. शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजकांनाही सन्मान देण्यावर भाजप सरकारचे धोरण आहे, असाही उल्लेख त्यांनी केला.
पालकत्व स्वीकारून समस्या सोडवू
जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा पुरविण्याबाबत महानगरपालिका व औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यातील वादामुळे एमआयडीसीचा विकास खुंटून तेथील उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मुद्यावर बोलताना खासदार पाटील म्हणाले की, मनपापेक्षा एमआयडीसी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. त्यामुळे एमआयडीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन त्यांना सुविधा पुरविण्यावर सूचना देऊ. या सोबतच आता शेळगाव बॅरेजच्या कामामुळे पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याने एमआयडीसीत उद्योग वाढू शकतात, असे सांगून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण एमआयडीसीचे पालकत्व स्वीकारू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून दिली.
लघु उद्योगांसाठी प्रयत्न करणार
आज अनेक विद्यार्थी पदवी घेतात, मात्र त्यांना प्रात्यक्षिक करणे शक्य नसते. त्यामुळे हा ‘स्कील गॅप’ दूर करण्यासाठी आपला भर आहे. या सोबतच जळगावात लघु उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करून रोजगार निर्मितीसाठीही पाठपुरावा करु अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
स्थानिक उद्योगांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
उद्योजकांकडे दरोडेखोर म्हणून राजकारणी पाहत असतात, मात्र भाजपचे तसे धोरण नाही. उद्योजकांसाठी सोयी-सुविधा मिळाल्याच पाहिजे, यासाठी सरकारचे प्रयत्न असून जळगावातही येथील स्थानिक चटई, पाईप उद्योगासह हळद, दूध, कापूस, केळी यांच्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचेही नियोजन असल्याचे खासदार पाटील म्हणाले.
व्यापाºयांचेही प्रश्न सोडविणार
व्यापारी बांधवांविषयी सरकारला सन्मान आहे. त्यामुळे जीएसटीमध्ये वारंवार बदल करण्यात आले. आताही जळगावातील व्यापाºयांचे विविध करांचे प्रश्न असो अथवा गाळ््यांचा मुद्दा, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: Honorary entrepreneurs along with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव