धरणगावात कोरोना वीरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:09 PM2020-08-20T19:09:19+5:302020-08-20T19:10:05+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचा 'कोरोना वीर' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रांत विनय गोसावी यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
धरणगाव, जि.जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचा 'कोरोना वीर' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रांत विनय गोसावी यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे, कर्तव्यचे अध्यक्ष सुनील चौधरी, एनसीसी मेजर डी.एस.पाटील, पत्रकार बी.आर.महाजन मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार आरोग्य विभागाच्या वतीने स्मृतीचिन्ह तथा गौरवपत्र देऊन करण्यात आला.
कोरोना काळात सख्खी, जवळची नाती दूर गेली, पण शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांनी नाती जोडून सेवाभाव जपला. शहरातल्या माणसांना आपल्या गावचे आणि रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाचे महत्त्व समजले, असे भावनिक कथन एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले. सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे, डॉ.गिरीश चौधरी, डॉ.छाया बोरसे, डॉ.रोहिणी अतुल शिंदे, डॉ.संदीप वसंत पाटील, डॉ.प्रीती संदीप पाटील, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ.कृष्णा मगर, डॉ.करण पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ.सारिका पाटील, डॉ.मयूर हिवरकर, डॉ.रितूल पाटील, डॉ.दीपक ठाकूर, डॉ.महेश कोंबळे, डॉ.मोशे बारेला, डॉ.विनय कुमट, जयश्री राव, अनिल बोरसे, दिनेश बडगुजर, सुवर्णा पाटील यांचा आणि धरणगावच्या गौतम नगर, संजय नगर परिसरात रुग्णांची तपासणी करून कोरोना जनजागृती मार्गदर्शन करणारे दंतचिकित्सक डॉ.निपुण संजीवकुमार सोनवणे यांना कोरोनावीर पुरस्कार स्मृती सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक आर.डी.महाजन व नाजनिन शेख यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश महाजन, अरविंद चौधरी, सागर पाटील, अमोल चौधरी, गोपाल चौधरी आणि योगेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.