कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:46+5:302021-02-06T04:28:46+5:30

वाहतुकीची कोंडी जळगाव : अजिंठा चौफुलीवर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी नेहमीच होत असल्याचे चित्र आहे. मात्र, शुक्रवारी ...

Honoring Corona Warriors | कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Next

वाहतुकीची कोंडी

जळगाव : अजिंठा चौफुलीवर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी नेहमीच होत असल्याचे चित्र आहे. मात्र, शुक्रवारी तर चारही बाजुंनी वाहने येत असल्याने दहा ते पंधरा मिनिटे वाहने अडकून होते. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने वेगाने येत असल्याने अपघाताचा धोका वर्तविण्यात येत असतो.

नो पार्किंगमध्ये वाहने

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नो पार्किंगच्या फलकासमोरच दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यात आल्याचा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. काही महिन्यांपासूनच्या पार्किंगच्या शिस्तीला यामुळे गालबोट लागले असून ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यामधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.

फोटो आहे सिव्हील नावाने एपीएस फोल्डरला

कोरोनाचे ३२४ रुग्ण

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचे ३२४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. यात सर्वाधिक १५९ सक्रीय रुग्ण हे जळगाव शहरात असून रावेर, धरणगाव तालुक्यात सर्वात कमी प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण आहेत. यात १७७ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

कामांच्या नियोजनाची धावपळ

जळगाव : जिल्हा परिषदेत विविध कामांच्या प्रशाकीय मान्यता व कामांच्या याद्या यावरून सदस्य, अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी दोन दिवसात विविध अटी टाकून ४५ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या.

पगार रखडले

जळगाव : महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहे. दोन ते तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नसल्याची माहिती आहे. दरम्यान, शासनाकडून निधी नसल्याने पगारास अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुत्र्यांचा धुमाकूळ

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा उपचारासाठी धाव घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या आठवड्यात एकाच दिवसात दहा जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. यासह वाघनगरातील सात बालकांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याने दहशत पसरली होती.

साडेचार हजारांपेक्षा अधिक रुग्ण

जळगाव : जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये साडेचार हजार व त्यापेक्षा अधिक रुग्णांची नोंद आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १३५५४ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील असून त्यापैकी १३०९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर भुसावळ ४५५३, अमळनेर ४५९९, चोपडा ४६३७ अशी रुग्ण संख्या नोंदविली गेली आहे.

Web Title: Honoring Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.