शानभाग विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:41 PM2020-08-10T21:41:31+5:302020-08-10T21:41:41+5:30
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय येथे गुणवत्ता यादीत आलेल्या प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या गुणवंतांचा ...
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय येथे गुणवत्ता यादीत आलेल्या प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आॅनलाईन पध्दतीने नुकताच पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे सहआयुक्त तथा ‘धडपडणाऱ्या तरुणाईसाठी’ या पुस्तकाचे लेखक संदीपकुमार साळुंखे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी केशवस्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर होते़ त्यासोबतच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, राजेंद्र नन्नवरे, पूनम मनुधने आणि मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे तसेच जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती़ प्रास्ताविक राजेंद्र नन्नवरे यांनी केले़ त्यानंतर मुख्याध्यापिका अंजली महाजन यांनी शाळेबाबत माहिती दिली़
विद्यार्थ्यांचा सत्कार
आॅनलाईन कार्यक्रमात विद्यालयातील प्रथम पाच आणि निवासी विद्यालयातून प्रथम पाच आणि विषयवार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या आई व बाबांसोबत पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला़ यावेळी खान्देशातून प्रथम आलेली समीक्षा विजय लुल्हे हिचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार केला़ तर द्वितीय ठरलेली कोटीज्या नेमाडे हिचा नितीन सोनवणे यांनी तर तृतीय आकाश अनिल धामणे याचा संजायपाल यादव, चतुर्थ ओम सतीश येवले यांचा अनुराधा देशमुख व पाचवी ठरलेली कृतिका सतीश अग्रवाल हिचा सूर्यकांत पाटील यांनी सत्कार केला़ त्यानंतर संदीपकुमार साळुंखे यांनी मार्गदर्शन केले़ त्यात त्यांनी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या गुणांचे ओझे पुढील आयुष्यात लादून घेऊ नये, तसेच आवाहन त्यांनी पालकांना सुद्धा केले. सूत्रसंचालन रवींद्र पाटील आणि मनोज पाटील यांनी केले तर परिचय प्रवीण पाटील यांनी करून दिला. मनोज पाटील यांनी आभार मानले.