आदर्श मतदान केंद्रासाठी धडपडणाऱ्या तलाठ्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 03:10 PM2021-01-22T15:10:05+5:302021-01-22T15:10:30+5:30

वाडे येथील तलाठी रत्नदीप माने यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Honoring the struggling Talatha for an ideal polling station | आदर्श मतदान केंद्रासाठी धडपडणाऱ्या तलाठ्याचा सन्मान

आदर्श मतदान केंद्रासाठी धडपडणाऱ्या तलाठ्याचा सन्मान

Next

कजगाव, ता.भडगाव : तालुक्यातील वाडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यासाठी धडपड करणारे तलाठी रत्नदीप माने यांना सन्मानित करण्यात आले.
तहसीलदार तृप्ती धोडमिसे  यांच्या संकल्पनेतून आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मतदारांना आदर्श मतदान केंद्रांवर उत्तम सुविधा मिळतील याची दक्षता घेण्यात आली होती. ते उभारण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तलाठी रत्नदीप माने यांनी परिश्रम घेतले होते. तसेच त्यांनी १० गावांचा अतिरिक्त पदभार सांभाळून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान एव्हीएम मास्टर ट्रेनर म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली. या बाबीची दखल घेत तहसीलदार तृप्ती धोडमिसे  यांनी माने यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले
या मतदान केंद्रांवरील अपंग, महिला आणि वृद्ध लोकांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली गेली. त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्वसाधारण मतदान केंद्रांच्या असह्य वातावरणापेक्षा इथले वातावरण बर्‍याच प्रकारे विशेष असेल याची दक्षता घेण्यात आली होती. मतदारांना आदर्श मतदान केंद्रावर पोहोचण्यास अडचण येऊ नये, यासाठी केंद्राच्या कक्षेत असलेल्या सर्व मार्गांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. कोरोना संबंधित सूचनांचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करण्यात आले होते. लोकांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागेल, यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. आदर्श मतदान केंद्रांवर मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणा घरे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे,  रॅम्प उपलब्ध होते. या केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होत्या. गर्भवती महिलांना किंवा त्यांच्या हाताला लहान मुले असल्यास प्राधान्याच्या आधारावर महिला मतदारांना प्रथम मतदान करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच त्यांना विश्रांतीसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व मतदार शांततेत व आरामात मतदान करू शकतील यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर व्यवस्था केली होती 

Web Title: Honoring the struggling Talatha for an ideal polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.