८ रोजी महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:29+5:302021-03-06T04:16:29+5:30

अनधिकृत बांधकाम जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे ग्रामपंचायतीने रहदारीच्या रस्त्यावर स्वच्छतागृह बांधून अतिक्रमण केले असून हे बांधकाम त्वरित तोडावे ...

Honoring women on the 8th | ८ रोजी महिलांचा सन्मान

८ रोजी महिलांचा सन्मान

Next

अनधिकृत बांधकाम

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे ग्रामपंचायतीने रहदारीच्या रस्त्यावर स्वच्छतागृह बांधून अतिक्रमण केले असून हे बांधकाम त्वरित तोडावे व याचा पैसा लोकसेवकांकडून वसूल करावा, अशी मागणी राजू गंगाराम कुमावत यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

एक अधिकारी बाधित

जळगाव : जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील एक अधिकारी शुक्रवारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थ विभागात बाधितांची संख्या चारवर पोहोचली असून या विभागात शुक्रवारी सॅनिटायझेशन केले जात होते. जिल्हा परिषदेत बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

तर सभांवर निर्बंध

जळगाव : बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास जिल्हा परिषदेच्या आगामी स्थायी समिती व विशेष सभांवर निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यातरी या सभा ऑफलाइन घेण्याचेच नियोजन केले जात असले तरी नियमित बाधितांची वाढणारी संख्या बघता संख्या वाढल्यास सभा ऑनलाइन घेण्यात येऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

Web Title: Honoring women on the 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.