पारा ११ अंशावर गेल्याने जळगावकरांना भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:53 PM2017-11-29T18:53:52+5:302017-11-29T18:57:13+5:30
मंगळवारी हंगामातील निचांकी तापमानाची नोंद
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : गेल्या तीन दिवसात शहराच्या पाºयात चांगलीच घट झाली आहे. मंगळवारी या हंगामातील सर्वात निचांक म्हणजेच १० अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर बुधवारी देखील ११ अंशावर पारा कायम होता. त्यामुळे जळगावकरांना सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली आहे. दरम्यान, आगामी पाच दिवसात तापमानात घट होणार असून शहराचा पारा ८ अंशावर जाण्यचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. मात्र काही दिवस तापमानात सारखा चढ-उतार पहायला मिळत आहे. मात्र गेल्या आठवड्यात शहराचा रात्रीचा पारा १६ अंशावर होता. मात्र तीन दिवसांपासून तापमानात सारखी घट होत आहे. शनिवारी १५ अंशावर असलेला शहराचा पारा मंगळवारी १० अंशावर आला होता. थंडी वाढल्याने शहरात स्वेटर विक्रीसाठी आलेल्या तिबेटीयन बांधवांकडे देखील ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
उत्तरेकडून येणाºया शीत लहरचा परिणाम
उत्तरेकडील जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश भागात गेल्या आठवड्यात बर्फ वृष्टी झाल्यामुळे उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच हवेचा विक्षोभ तयार झाला असल्यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट आली आहे. हवेचा दाब अजून आठवडाभर कायम राहणार असल्यामुळे जळगावात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानात देखील घट झाली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रब्बीच्या गहु, हरभरा या पिकांना चांगलाच लाभ होत आहे.
आगामी पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज
तारीख - किमान तापमान - कमाल तापमान
३० नोव्हेंबर - १० - ३३.०१
१ डिसेंबर - १० - ३२
२ डिसेंबर - ९ - ३२
३ डिसेंबर - ९ - ३१.४
४ डिसेंबर - ८ - ३१