आशा कर्मचाऱ्यांना मानधनवाढ मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:52 PM2019-09-02T21:52:17+5:302019-09-02T21:52:23+5:30
चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी ...
चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी केली आहे. यासह इतर मागण्यांसाठी तहसीलदारांना २ रोजी निवेदन सादर करण्यात आले.
येथे २ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर सकाळी ११ वाजता आशा कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष, कामगार नेते अमृतराव महाजन उपस्थित होते. नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना १७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ‘आशां’ना तेलंगणा राज्याप्रमाणे किमान १० हजार रुपये मानधन व किमान ६ हजार पेन्शन द्यावे. मानधनवाढीचा रखडलेला आदेश काढावा. एकछत्री योजना अमलात आणावी, १२०० रुपये स्टेशनरी खर्च मिळावा तसेच मे महिन्यापासूनचा थकीत मोबदला द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी अमृतराव महाजन यांच्यासह शैला परदेशी, मीनाक्षी सोनवणे, संगिता पाटील, मनिषा पाटील, संजना विसावे, पल्लवी सोनवणे, अनिति पाटील, कल्पना महाले, ललिता भादले, योगिता कोळी, रेखा पाटील, वनिता मोरे, शितल पाटील, संगिता पाटील, ज्योती चित्रकथी, संजना विसावे, आदींनी केले आहे.