हॉर्नवर नियंत्रण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:22+5:302020-12-08T04:14:22+5:30
निविदांना मुदतवाढ जळगाव : ऑक्सिजन टँकसाठी लागणाऱ्या लिक्विडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून या निवदा सोमवारी उघडण्यात येणार होत्या. ...
निविदांना मुदतवाढ
जळगाव : ऑक्सिजन टँकसाठी लागणाऱ्या लिक्विडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून या निवदा सोमवारी उघडण्यात येणार होत्या. मात्र, पोर्टलमध्येच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या निविदांना आपोआप मुदतवाढ मिळाली आहे. अपडेट झाल्यानंतर त्या निवदा उघडतील, असे सांगण्यात आले आहेत.
८७ अहवाल प्रलंबित
जळगाव : जिल्हाभरात कोरोना चाचण्यांचे ८७ अहवाल प्रलंबित आहेत. येत्या एक दोन दिवसात हे अहवाल येणार आहे. तपासण्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अन्य अहवालांची संख्या ही ११३८ असून यात अनेक अहवाल हे अस्पष्ट असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
कोविड रुग्णालयात बैठक
जळगाव : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांची नोंद करावी, यासाठी बैठक घेऊन डॉक्टरांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. दर शनिवारी ही बैठक घेण्यात येणार आहे. मध्यंतरी या संदर्भात नियोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांन ही बैठक घेऊन सूचना दिल्या.