कुंडली मुहूर्त
By admin | Published: May 19, 2017 12:01 PM2017-05-19T12:01:33+5:302017-05-19T12:01:33+5:30
केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - प्रिय केतू, सप्रेम आठवण,
ममा-पपांच्या लगAाच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छादेखील देऊ शकलो नाही. रविवारी नीरज घरी आला तेव्हाच कोल्हापूरहून ममांचा फोन आला. त्याचवेळी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. पपा नव्हतेच. ते बहुधा ऑफिसला गेले असावेत. नीरजच्या दृष्टिकोनातून पत्रिका (स्वागत सोहळ्याची) नीट प्रिंट झाली नाही. त्यावरचा गोल्ड अजिबात नीट प्रिंट झालेला नव्हता. नीरज प्रेसवाल्यांना विचारायला जाणार होता.
केतू, त्यातला मजकूर, व्हिज्युअल इतके जोरदार आणि बराच वेळ गुंगवून ठेवणारे आहे की; नीरज म्हणतो, त्या उणिवांकडे कुणाचे लक्षच जाणार नाही.
माझी साहित्यिक मैत्रीण अरुणा ढेरे यांना तुमच्या विवाहाबद्दल सांगितले. ती फारच आनंदून गेली. 30/35 वर्षापूर्वीची ही मैत्रीण. हिचे वडील म्हणजे थोर इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे. आम्ही 30 वर्षापूर्वी त्यांच्या शनिवारपेठेतल्या घरी जायचो. त्यांच्या घरच्या भिंती या पुस्तकांच्याच होत्या. त्या घरात आम्हा मित्रांना संकोच कधी वाटला नाही, इतकी घरातील माणसे ऋजू आणि स्वागतशील होती. माझा गोव्याचा मित्र, तसेच कोलकात्याहून येणारा संकेत हा तुमच्या पिढीचा आहे. पण माझा मित्र आहे. तो आपल्या घरचा सदस्यच आहे. त्याचे घर जळगावी आहेच. तो आठ दिवस रजा घेऊन येतोय. तो स्वागत सोहळ्यालाही असणार आहे.
माङो लवकर जाग येण्याचे सत्र सुरूच आहे. कामांच्या व्यस्ततेत वेळ मात्र सार्थकी लागतो आहे. मोठय़ा घरचा संदीप ऑफिसला जाण्यापूर्वी रोज एक चक्कर टाकतोय. मांडवाचे रूप आता बरेचसे स्पष्ट होत आहे.
दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या नव्या (शोध स्वामी विवेकानंदांचा) पुस्तकाचा परिचय वाचनात आला. भविष्य आणि ग्रहविद्येवर प्रहार करताना विवेकानंद म्हणतात, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणा:या माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, असे मानणे हा भंपकपणा आहे. मानवी समाजाचे अपरंपार नुकसान करणारा, मानवी मनाला होणारा तो एक रोग आहे’ असे म्हणून त्यांनी कुंडली-मुहूर्त या सा:याच गोष्टी निकाली काढल्या आहेत.
तुङो आजोबा अण्णा विचारतात, आपली भेट केव्हा? तेव्हा वाटले होते लगAाआधी भेट होईल, पण ते राहिलेच. केतू लहानची मोठी ज्या घरात झाली, ते घर पाहायचे राहूनच गेले. आता तेही नंतरच. केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे.
अच्छा!
तुङो आई-बाबा.
- जयंत पाटील