सरपंच आरक्षणाआधी घोडेबाजार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:02+5:302021-01-23T04:16:02+5:30
देसाई यांची किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट जळगाव- हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई हे गुरुवारी जळगावात आले ...
देसाई यांची किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट
जळगाव- हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई हे गुरुवारी जळगावात आले होते. नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या निवासस्थानी धनंजय देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आबा बाविस्कर, गणेश चौधरी, बंटी गवळी, विनोद कोळी, बाळा बाविस्कर यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.
भुयारी गटार योजनेमुळे नळकनेक्शन फुटल्याने अडचणी
जळगाव - मेहरूण भागातील मास्टर कॉलनी परिसरात भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे दररोज १०-१२ घरांचे नळकनेक्शन फुटत आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागत आहेत. जोडणी केल्यावरही अनेक लोकांना दुसऱ्यांदा पाणी मिळाले नाही. तसेच खोदकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडियाप्रमुख सलीम इनामदार यांनी केली आहे.
प्रभाग समिती-३ च्या कार्यालयात उपमहापौरांनी दिली भेट
जळगाव - मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी शुक्रवारी प्रभाग समिती-३ च्या कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचारीवर्गासाठी पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नसल्याने आठवडाभरात पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. प्रभाग समिती सभापती सुरेखा तायडे यांच्यासह मनपाचे इतर नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपमहापौरांनी अभय योजनेचादेखील आढावा घेतला.
कानळदा रस्त्यावरील अतिक्रमण काढा
जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील जुना धुळे रोड व कानळदा रस्ता हा डी.पी.प्लॅननुसार १५ मीटरचा आहे. मात्र, या भागातील जिनिंगमालकांनी रस्त्याचा दोन्ही बाजूस अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता आता केवळ १० मीटरचा आहे. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने या रस्त्याची मोजणी करून, झालेले अतिक्रमण तोडावे, अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.