रुग्णालय स्थलांतराचा रुग्णांना ‘ताप’!

By admin | Published: March 15, 2016 12:49 AM2016-03-15T00:49:54+5:302016-03-15T00:49:54+5:30

धुळे : जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर सोमवारपासून चक्करबर्डी येथील नूतन इमारतीत झाल़े

Hospital 'migrating' patients! | रुग्णालय स्थलांतराचा रुग्णांना ‘ताप’!

रुग्णालय स्थलांतराचा रुग्णांना ‘ताप’!

Next

धुळे : जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर सोमवारपासून चक्करबर्डी येथील नूतन इमारतीत झाल़े पहिल्या दिवशी वाहतूक व्यवस्था नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे हाल झाल़े याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या़

जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नवीन इमारतीत झाल़े जुन्या इमारतीत दाखल असलेल्या सर्व रुग्णांनादेखील नवीन इमारतीत रुग्णवाहिकेने नेण्यात आल़े जुन्या रुग्णालयात आलेल्या अशिक्षित रुग्णांना मात्र स्थलांतराचा मोठा फटका बसला़ भरउन्हात रिक्षा मिळवून त्यांना नवीन इमारत गाठावी लागली, त्यामुळे काही नागरिकांनी एवढय़ा दूर जाणेच टाळल़े

तर अनेकांना स्थलांतराचे फलक पाहून माघारी फिरावे लागल़े तर दुसरीकडे नवीन इमारतीत पहिलाच दिवस असल्याने स्वच्छता होती़ मात्र कॅन्टिन इमारतीच्या मागील बाजूस असून ते देखील विद्याथ्र्यासाठी आह़े त्यामुळे रुग्णांना रुग्णालयाबाहेर आलेल्या दुकानांवरच भूक भागवावी लागली़ तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आल़े एवढेच नव्हे तर रविवारी सुरू असलेली लिफ्टदेखील सोमवारी बंद असल्याचे निदर्शनास आल़े या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ़ अनंत बोर्डे यांनी सांगितल़े

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

शहरातील बसस्थानकापासून चक्करबर्डी रुग्णालयाचे अंतर 8 कि.मी. आह़े त्यासाठी 15 ते 20 रुपये भाडे आकारणी केली जात़े तर रेल्वेस्थानकापासून हे अंतर 7 कि.मी. असून तिथूनही 15 ते 25 रुपये आकारणी केली जात असल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात आल़े पहिल्या दिवशी मात्र रिक्षाचालकांनी अवाच्या सव्वा भाडेआकारणी केल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली़ अनेक रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक सीट घेऊन चक्करबर्डीला दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाल़े

राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू केली जाणारी मिनी बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आह़े कारण रुग्णांची गरज ओळखून खासगी वाहनधारक अडवणूक करतात़ त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न व अधिकृत थांबे निर्मिती करणे आवश्यक आह़े

Web Title: Hospital 'migrating' patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.