पहूर रूग्णालयात परिचारकास जि.प.सदस्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 04:26 PM2019-06-01T16:26:16+5:302019-06-01T16:26:55+5:30

तणावाची स्थिती : जि.प.सदस्यांसह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा

At the hospital, the nurse assaulted the nurse in the hospital | पहूर रूग्णालयात परिचारकास जि.प.सदस्याकडून मारहाण

पहूर रूग्णालयात परिचारकास जि.प.सदस्याकडून मारहाण

googlenewsNext


पहूर, ता.जामनेर : केवडेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपात बसलेल्या महिलांच्या अंगावर स्लॅबच्या प्लॅस्टरचा मलबा पडल्याने पाच महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर पहूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करणाऱ्या अधिपरीचारकास अज्ञात चार ते पाच तरुणांसह जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी दोन महिलांना पुढील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य तीन जणांवर पहूर येथे उपचार सुरू आहे त.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार केवडेश्वर महादेव मंदिरात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने काही महिला मंदिराच्या सभामंडपात बसलेल्या होत्या. या दरम्यान छताच्या प्लॅस्टरचा थोडासा भाग अचानक काही महिलांच्या अंगावर पडला. यात गिताबाई गजानन मोहाळे ४० रा वाकोद, सुरेखा दीपक मोहाळे ३०, रा वाकोद, रंजना कैलास पाटील ३० रा. बिल्दी, चंद्रभागा भाऊराव देशमुख, ५० पिंपळगाव बु,. प्रयाग भास्कर पाटील रा. पहूर हे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी पहूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. अधिपरीचारक अविनाश कराड हे जखमींवर उपचार करीत असताना रूग्णालयात जमलेल्या जमावातून संतप्त काही अज्ञातांसोबत कराड यांची शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूंपातर मारहाणीत झाल्याचे समजते. यामुळे काही काळ रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी गिताबाई मोहाळे व सुरेखा मोहाळे यांना पुढील उपचारासाठी अरविंद देशमुख यांनी जळगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.
डॉ. हर्षल महाजन यांना कोणी तरी शिविगाळ व अंगावर धावून आल्याचे स्वत: डॉ.महाजन यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अविनाश कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात जि.प.सदस्य अमित देशमुख यांच्याससह चार ते पाच जणांना विरुद्ध शासकीय कामात अडथळा , मारहाण व शिविगाळ केली व शासकीय उपकरणांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट करीत आहे. दरम्यान, परस्परविरोधी गून्हा दाखल करण्याचे कामरात्री उशिरापर्यंत सुरू होते. हाणामारीच्या घटनेनंतर काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रूग्णालयात जमाव होता. वैद्यकीय अधिकारी जखमींवर प्रथमोपचार करण्यास विलंब करीत होते. संतप्त रूग्णांचे नातेवाईक प्रथमोपचार करण्याची मागणी करीत होते. पदाधिकारी नात्याने संबंधित अधिपरीचारक यांना सांगत असताना त्यांनी अरेरावी केली. त्याकडे दुर्लक्ष करून उपचार करण्याची मागणी केली. कोणाला मारहाण व शिविगाळ केली. नाही. जाणीव पूर्वक माझे नाव गोवले आहे.
- अमित देशमुख, जि.प.सदस्य.

४जि.प. सदस्य अमित देशमुख हे जखमींवर उपचार करण्यासाठी अधिपरीचारक अविनाश कराड याला सांगत असताना कराड यांनी देशमुख यांना अरेरावी केली. त्यामुळे वातावरण तापले व काही उपस्थितांमध्ये व कराड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले आहे.

Web Title: At the hospital, the nurse assaulted the nurse in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.