रुग्णसेवा ऑक्सीजनवर
By admin | Published: March 28, 2017 12:13 AM2017-03-28T00:13:24+5:302017-03-28T00:13:24+5:30
हेळसांड : ईएसआयसीत अनेक पदे रिक्त
जळगाव : खाजगी क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने त्यांना ईएसआयसीचे सुरक्षा कवच दिले आहे. मात्र जळगाव कार्यालयातील डॉक्टर व कर्मचा:यांची रिक्तपदे व रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे उपचाराला विलंब होत असून त्यामुळे शहरातील दोन सेवा दवाखान्यासमोर सोमवारी सकाळी रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या.
खाजगी व्यवसाय क्षेत्रात काम करणा:या सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना उपचार मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ईएसआयसीच्या कक्षेत आणले आहे. या रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी ईएसआयसीतर्फे अयोध्या नगर व जिल्हा न्यायालयासमोरील जागेत असे दोन सेवा दवाखाने सुरू आहेत.
उपचारासाठी प्रतीक्षा
सेवा दवाखान्यांसाठी डॉक्टराची तीन, परिचारिका 1, लिपीक 1, औषध निर्माता 2, शिपाई 3, ड्रेसर 1, स्विपर 1 अशी पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीला डॉक्टरांची दोन पदे, परिचारिका, लिपीक, शिपाई व ड्रेसर तसेच औषध निर्माताचे एक पद रिक्त आहे. मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण व कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
सध्या डॉ.आर.बी.चव्हाण हे इनचार्ज डॉक्टर तर डॉ.एस.डी.फालक यांची तात्पुरती नियुक्ती आहे. सोमवारी सकाळी सेवा दवाखान्यामध्ये रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.
ओपीडीमध्ये वाढ
ईएसआयसी अंतर्गत सुरुवातील जळगाव औद्योगिक वसाहत भागातील सुमारे 22 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सामावून घेतले होते. मात्र या योजनेत आता छोटय़ा मोठय़ा सर्वच उद्योगातील कामगार तसेच तालुकास्तरावरील कंपन्यांमधील कामगारांचा समावेश केल्याने ही संख्या सुमारे 40 हजारांर्पयत पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालय परिसर व अयोध्या नगरातील सेवा दवाखान्यांमध्ये सुरुवातीला 90 ते 95 र्पयत होणारी ओपीडी (बाह्य रुग्णसेवा) ही आता रोज 200 र्पयत पोहचली आहे.
इएसआयसीच्या लाभार्थीची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक कंपन्या जोडल्या गेल्याने ही संख्या वाढली आहे. -डॉ. राजेंद्र चव्हाण,
प्रमुख वैद्यकीय अधिकारी